उत्तर प्रदेश निवडणूक प्रकियेस आज सुरवात

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

लखनौ ः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्याअंतर्गत 11 फेब्रुवारीला 73 मतदारसंघात मतदान होणार असून याबाबतची अधिसूचनाही काढण्यात आली आहे.

लखनौ ः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्याअंतर्गत 11 फेब्रुवारीला 73 मतदारसंघात मतदान होणार असून याबाबतची अधिसूचनाही काढण्यात आली आहे.

पंधरा जिल्ह्यांत पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आजपासून (ता. 16) आपले अर्ज दाखल करता येणार असून 24 जानेवारी ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. 27 जानेवारीपर्यंत उमेदवारांना त्यांचे अर्ज माघारी घेता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभेसाठी 11 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान सात टप्प्यांत मतदान होणार असून पहिला टप्प्यात पश्‍चिमेकडील जिल्ह्यांचा समावेश आहे. असंवेदनशील म्हणून ओळख असलेल्या मुझफ्फरनगर व शामली जिल्ह्यांतही 11 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे.

Web Title: uttar pradesh elections process strats