उत्तर प्रदेशची 'कसाब'पासून सुटका करणार- शहा

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांना 26/11ची उपमा देत 'कसाब' म्हटले आहे. उत्तर प्रदेशची 'कसाब' पासून सुटका करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

गोरखपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीदरम्यान बोलताना शहा म्हणाले, 'कसाब' म्हणजे काँग्रेस, समाजवादी व बहुजन समाज पक्ष. राज्यात जोपर्यंत 'कसाब' आहे, तोपर्यंत राज्याची प्रगती होणार नाही. उत्तर प्रदेशातील नागरिक निवडणूकीमधून 'कसाब'ला नक्कीच दूर करतील.'

दरम्यान, उत्तर प्रदेशात प्रचारादरम्यान भाजपच्या विविध नेत्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे सरकार आल्यास राज्याचा विकास करू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध नेत्यांनी दिले आहे.

Web Title: Uttar Pradesh to free the state from 'KASAB'- shah