Crime News : रात्रभर पाऊस झाल्याने मृतदेह जमिनीबाहेर आला होता, सकाळी लोकांना हात-पाय दिसू लागले अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uttar Pradesh Crime News

Crime News : रात्रभर पाऊस झाल्याने मृतदेह जमिनीबाहेर आला होता, सकाळी लोकांना हात-पाय दिसू लागले अन्...

Uttar Pradesh Crime News : सकाळी-सकाळी लोक घराबाहेर पडत होते. रात्रभर पाऊस झाल्याने पुरलेता मृतदेह जमिनीबाहेर आला होता. लोकांना हात-पाय दिसू लागले... ते एका महिलेचं प्रेत होतं. कुणीतरी नुकतंच जमिनीखाली पुरलेलं. परंतु पावसाने उघडं पडलेलं..

उत्तर प्रदेशमधल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमच्या बहराईच जिल्ह्यातील ही घटना आहे. मातीमध्ये दबलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तपासानंतर सदर महिलेचा खून झाल्याचं निष्पन्न झालं. तिच्या नवऱ्यानेच तिचा खून केला होता.

हेही वाचाः एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

मृत महिलेचा खून करुन तिच्या नवऱ्याने तिचा मृतदेह घरासमोरच पुरला आणि त्याने पलायन केलं. मृत महिलेच्या आई-वडिलांनी आरोप केला की जावयाने २० हजार रुपयांसाठी मुलीचा खून केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यातल्या मोतिपूर पोलिस ठाण्यांतर्गत शुक्रवारी ही घटना घडली. मृत महिलेचं नाव शर्मा देवी होतं तर तिच्या नवऱ्याचं नाव प्रदीप बोट आहे. तो मागील काही दिवसांपासून पत्नीकडे २० हजार रुपयांची मागणी करीत होता, असा आरोप मृत महिलेच्या पित्याने केला आहे. शिवाय तो तिला मारहाण करायचा. शुक्रवारीही त्याने दारु पिवून येऊन तिला मारहाण केली आणि तिचा खून केला.

खूनानंतर त्याने तिचा मृतदेह मातीखाली पुरला आणि तिथून पळून गेला. रात्री झालेल्या पावसामुळे मृतदेहावरची माती वाहून गेली आणि लोकांना मृतदेहाचे हाय-पाय दिसू लागले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याचं महिलेच्या पित्याने पोलिसांना सांगितलं.

टॅग्स :Uttar PradeshCrime News