जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू; हिंदू युवा वाहिनीवर आरोप

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

एका ज्येष्ठ नागरिकाला जमावाने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिंदू युवा वाहिनीच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिंदू युवा वाहिनीच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

बुलंदशहर येथील सोही गावातील 19 वर्षाच्या मुलाने शेजारच्या गावातील 18 वर्षाच्या हिंदू धर्माच्या मुलीला पळविले. या प्रकरणी मुलाचे नातेवाईक गुलाम मोहम्मद (वय 45) यांना मंगळवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास समूहाने मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुलाम यांच्या कुटुंबियांनी हिंदू युवा वाहिनीवर आरोप ठेवले होते. पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतले असून त्यामध्ये हिंदू युवा वाहिनीवर संशय घेण्यात आला आहे. "ते सकाळी बागेत गेले होते. पाच ते सहा जणांनी सकाळी त्यांना बागेतून बाहेर ओढत आणले आणि मारहाण केली', अशी माहिती गुलाम मोहम्मद यांच्या मुलाने दिली. या प्रकरणी तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Uttar Pradesh: Man beaten to death in Bulandshahr