उत्तर प्रदेशात रुग्णावर बलात्कार

वृत्तसंस्था
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

गोंडा (उत्तर प्रदेश): येथील जिल्हा रुग्णालयात एका महिला रुग्णावर पुरुष परिचारकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या या महिलेवर पुष्कर कुमार नावाच्या पुरुष परिचारकाने काल रात्री बलात्कार केला. समाजवादी पक्षाचे उमेशकुमार सिंह म्हणाले की, या प्रकरणातील आरोपी फरारी झाला आहे.

आज सकाळी महिला परिचारक कामावर आल्यानंतर पीडित महिलेने तिला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. पीडित महिलेचा जबाब नोंदविल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी तिला पाठविण्यात आले आहे, असे ते म्हणाले. वैद्यकीय अहवालाच्या आधारे तक्रार दाखल करण्यात येईल आणि पुढील तपास केला जाईल, असे ते म्हणाले.

Web Title: uttar pradesh new Rape of the patient