तोंडी तलाक देणाऱ्याला पंचायतीकडून दंड

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

संभल (उत्तर प्रदेश): तोंडी तलाकबाबत सुरू असलेल्या वादामध्ये महिलांना दिलासा देणारा निर्णय येथील पंचायतीने घेतला आहे. तलाक देणाऱ्या पतीला दोन लाखांचा दंड आणि पत्नीकडून घेतलेला साठ हजार रुपयांचा हुंडाही परत करण्याचे आदेश तुर्क समुदायाच्या पंचायतीने दिले आहेत.

या पंचायतीला आजूबाजूच्या 52 गावांमधील लोक उपस्थित होते. दहाच दिवसांपूर्वी 45 वर्षांच्या मुस्लिम पुरुषाने 22 वर्षांच्या मुस्लिम युवतीशी विवाह केला होता. मात्र, त्यांच्यात भांडण झाल्याने पुरुषाने चिडून जाऊन तीन वेळेस "तलाक' हा शब्द उच्चारला आणि पत्नीला माहेरी घालवून दिले. पत्नीच्या कुटुंबाने पंचायतीकडे दाद मागितल्यावर या पंचायतीने कोणाचाही सल्ला न घेता तोंडी तलाक दिल्याबद्दल पतीला दंड करत हुंडाही परत देण्यास सांगितला.

Web Title: uttar pradesh news and talak