आझम खान व पुत्राला जिवे मारण्याची धमकी

वृत्तसंस्था
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

रामपूर: समाजवादी पक्षाचे नेते आझम खान व त्यांचे आमदार पुत्र अब्दुल्ला यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अबदुल्ला आझम खान यांनी याबाबत पोलिसांकडे शुक्रवारी (ता. 9) तक्रार दाखल केली आहे.

"आझम खान व अब्दुल्ला यांना 24 तासांत मारून टाकण्याची धमकी देणारा फोन आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांकावरून आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच दोन्ही नेत्यांना जादा सुरक्षा पुरविण्यात आली आहे. पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागातर्फे फोन कॉलचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विपीन टाडा यांनी दिली.

Web Title: uttar pradesh news azam khan crime threat of death