मेरठमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती तोडली

वृत्तसंस्था
बुधवार, 7 मार्च 2018

मेरठ (उत्तर प्रदेश): भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार व भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुर्ती तोडल्याची घटना आज (बुधवार) शहरात घडली. यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

रशियन क्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन, थोर द्रविडी विचारवंत पेरियार रामास्वामी नायकर, जनसंघाचे नेते श्यामा प्रसाद मुखर्जी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुर्तींची तोडफोड रोखण्याचे आदेश दिले आहेत.

मेरठ शहरातील मवाना परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आल्याचे आढळून आले. काही समाजकंटकांनी मंगळवारी रात्रीच मूर्तीची तोडफोड केल्याची शक्यता आहे. आंबेडकरांची मूर्ती तोडण्यात आल्याचे समजताच स्थानिकांनी जोरदार निदर्शने करत रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना शांत करत परिस्थितीवर आटोक्यात आणली. जिल्हा प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नवीन मूर्ती बसवण्यात आली आहे. पोलिस याबाबत शोध घेत आहेत.

Web Title: uttar pradesh news dr b r ambedkar's statue vandalised in meerut