उत्तर प्रदेशमध्ये वीज दरवाढ नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

बलिया: उत्तर प्रदेश सरकारने वीज भाववाढ करून सामान्य ग्राहकांवरील बोजा न वाढवता वीज क्षेत्रातील तोटा कमी करण्यासाठी नवे पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आहे.

बलिया: उत्तर प्रदेश सरकारने वीज भाववाढ करून सामान्य ग्राहकांवरील बोजा न वाढवता वीज क्षेत्रातील तोटा कमी करण्यासाठी नवे पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आहे.

याविषयी बोलताना ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा म्हणाले, "योगी सरकारने ग्राहकांवर वीज दरवाढीचा बोजा न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वीज क्षेत्राचा 21 हजार कोटी रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी वीजचोरी आणि वीज वितरणातील अनियमितता रोखण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार आहेत. राज्य सरकार 2018 पर्यंत नागरिकांना 24 तास वीजपुरवठा करणार आहे. या दृष्टीने सरकार पावले उचलत आहे. प्रामाणिक ग्राहकांची काळजी घेण्याचे सरकारचे धोरण आहे. आगामी काळात उत्तर प्रदेश ऊर्जा क्षेत्रामध्ये देशात आघाडीचे राज्य ठरेल.''

Web Title: uttar pradesh news electricity bill