कोरोनाग्रस्तांना मोबाईल वापरांसाठी बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

Uttar Pradesh News: Mobile Phones Banned in COVID Hospitals
Uttar Pradesh News: Mobile Phones Banned in COVID Hospitals

नवी दिल्ली - उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये फोनचा वापर करता येणार नाही. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी फोनवर बंद घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे डीजी मेडिकल केके गुप्ता यांनी रुग्णांवर मोबाईल बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे पत्रही पाठवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे महासंचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण) यांनी दिलेल्या आदेशानंतर राज्यातील कोविड-१९ रुग्णालयांमध्ये रूग्णांवर मोबाईल वापरास बंदी घातली आहे. डीजीच्या म्हणण्यानुसार मोबाईलमुळे कोरोनाचा संसर्ग पसरतो. यानंतर कोरोना वॉर्डमधील नवीन व्यवस्थेअंतर्गत रूग्णालयाच्या प्रभारींकडे २ मोबाईल असतील. ज्याद्वारे रुग्ण आपल्या कुटुंबियांशी बोलू शकतील.
----------
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा वापर कोणासाठी?
---------
हिंमतवान ज्योतीला ट्रम्प कन्येचा सलाम
--------- 
एल-२ आणि एल-३ रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना आयसोलेशन वॉर्डामध्ये मोबाईल फोन ठेवण्याची परवानगी नाही, कारण यामुळे संसर्ग पसरतो असं या आदेशांमध्ये असे स्पष्ट केलेलं आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना आपल्या कुटुंबाशी बोलण्यासाठी दोन मोबाईल असतील, यांचा ते वापर करू शकतात. या फोनमध्ये इन्फेक्शन प्रिव्हेंशन कंट्रोल असणार आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ६७६७ नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत तर १४७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक लाख तीस हजारांच्यावर पोहोचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com