निठारी हत्याकांड: पंधेर व सुरिंदरला फाशीची शिक्षा

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जुलै 2017

सीबीआय न्यायालयाचा निकाल

गाझियाबाद: निठारी हत्याकांडाशी संबंधित पिंकी सरकार हत्या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरोपी मोनिंदर पंधेर व सुरिंदर कोली या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

न्यायाधीश पवन कुमार तिवारी यांच्या पीठापुढे याप्रकरणाची सुनावणी झाली. पिंकी सरकारच्या (वय 20) अपहरणानंतर तिच्यावर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप या दोघांवर होता. ही घटना 5 ऑक्‍टोबर 2006 मध्ये घडली होती. न्यायालयाने आज त्यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली, अशी माहिती सीबीआय प्रवक्ते आर. के. गौर यांनी दिली आहे.

पोलिसांना डिसेंबर 2006 मध्ये तपासादरम्यान उद्योगपती पंधेर याच्या निठारीतील निवासस्थानी 19 जणांच्या कवट्या आढळून आल्यानंतर या हत्याकांडाचा पर्दाफाश झाला होता. दरम्यान, मोनिंदर व सुरिंदर यांच्यावर याप्रकरणी 19 आरोपपत्रे दाखल करण्यात आली होती. त्यापैकी तीन खटले पुराव्याअभावी रद्द करण्यात आले असून, नऊ खटल्यांत त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. उर्वरित सात खटल्यांवरील सुनावणी बाकी आहे.

Web Title: uttar pradesh news nithari case Death Penalty