रायबरेली: 'एनटीपीसी' प्रकल्पात स्फोट; 25 ठार 

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

चाचणी सुरू असताना दुर्घटना 
या घटनेविषयी "एनटीपीसी'ने म्हटले आहे, की पाचशे मेगावॉट क्षमतेच्या युनिटमध्ये बॉयलरची चाचणी सुरू असताना आज दुपारी ही दुर्घटना घडली. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून मदतकार्य सुरू आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य वेगाने सुरू आहे. 

लखनौ : राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या (एनटीपीसी) रायबरेली जिल्ह्यातील प्रकल्पात बुधवारी बॉयलरचा स्फोट होऊन 25 जण मृत्युमुखी पडले असून, शंभराहून अधिक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज (गुरुवार) मृतांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचशे मेगावॉट क्षमतेच्या युनिटमध्ये कामगार काम करीत असताना बॉयलरचा बुधवारी दुपारी स्फोट झाला. यात आतापर्यंत 25 जण ठार झाले तर शंभराहून अधिक कामगार जखमी झाले. अद्याप अनेक कामगार स्फोटाच्या ठिकाणी अडकून पडले असण्याची शक्‍यता आहे. "एनटीपीसी'ने हे युनिट नव्यानेच सुरू केले आहे. 

याविषयी माहिती देताना अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद कुमार म्हणाले, की रायबरेली जिल्ह्यात उनाचार येथे हा प्रकल्प आहे. घटनास्थळी अतिरक्ति रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या असून, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत कार्यावर ते देखरेख ठेवत आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकही लखनौमधून घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. 

चाचणी सुरू असताना दुर्घटना 
या घटनेविषयी "एनटीपीसी'ने म्हटले आहे, की पाचशे मेगावॉट क्षमतेच्या युनिटमध्ये बॉयलरची चाचणी सुरू असताना आज दुपारी ही दुर्घटना घडली. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून मदतकार्य सुरू आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य वेगाने सुरू आहे. 

Web Title: Uttar Pradesh NTPC blast: 25 killed, 100 injured