पाच राज्यांच्या निवडणुकाः कुठे, काय, कधी?

सचिन निकम/व्यंकटेश कल्याणकर
बुधवार, 4 जानेवारी 2017

आपण बना राजकीय विश्लेषक...

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबद्दल आपल्याला भाष्य करायचे आहे? eSakal.com वर आपण आपले भाष्य प्रसिद्ध करू शकता. आमच्याशी संपर्क साधाः

ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर 
 

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आज (बुधवार) घोषित झाल्या. या पाच राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या 102 जागा आहेत. मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्यादृष्टीने या पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे केंद्र सरकारच्या कामकाजाची पावती असणार आहे. त्याचवेळी, काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्यासाठी या राज्यांतील निवडणुका अस्तित्वाचा प्रश्न असणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकल्यामुळे त्यांना आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक जिंकणे प्रतिष्ठेचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावाः

उत्तर प्रदेश

 • मतदानाची तारीखः 11, 15, 19, 23, 27 फेब्रुवारी, 4 आणि 8 मार्च
 • एकूण जागाः 403 जागा
 • बहुमतासाठीः 202 जागा
 • लोकसभेच्या एकूण जागाः 80
 • विद्यमान मुख्यमंत्रीः अखिलेश यादव 
 • पक्षः समाजवादी पक्ष
 • सध्या कोणाची सत्ता आहेः समाजवादी पक्ष (सप)

मागील निवडणूकीत पक्षांना मिळालेल्या जागाः 

 • समाजवादी पक्ष - 224
 • बहुजन समाज पक्ष - 80
 • भाजप - 47
 • काँग्रेस - 28
 • राष्ट्रीय लोक दल - 9
 • अन्यः 16

राज्यासमोरील आव्हाने/प्रमुख समस्याः

 • सत्ताधारी समाजवादी पक्षातील अंतर्गत कलह पक्षाला फायद्याचा ठरेल की तोट्याचा हे काळच ठरवेल
 • अखिलेश यादव यांनाच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पसंती
 • मायावती यांचा बसप आणि सप यांच्यात प्रमुख लढतीची शक्यता
 • 2014 लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 81 पैकी 71 जागा जिंकणाऱ्या भाजपची ताकद वाढली
 • काँग्रेसच्या रिटा बहुगुणा जोशी, बसपचे केशव प्रसाद मोर्य यांसह प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश 
 • भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा सक्षम चेहरा नाही
 • राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लोकसभेतील जादू टिकविण्याचे आव्हान
 • उत्तर प्रदेश म्हटले की राम मंदिराचा मुद्दा पुढे येते, भाजपकडून सतत या मुद्द्यावर राजकारण
 • मुझफ्फरनगर येथील दंगल, दादरी येथील गोमांस प्रकरण पुन्हा उकरुन काढण्याची शक्यता
 • काँग्रेसकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित
 • सोनिया व राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ असूनही काँग्रेस यशापासून दूरच

मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदारः 

 • अखिलेश यादव (सप)
 • मायावती (बसप)
 • शीला दीक्षित (काँग्रेस)
 • राजनाथसिंह, योगी आदित्यनाथ (भाजप)

ओपिनियन पोलचे अंदाजः

 • एबीपी न्यूजः सप (141 ते 151), बसप (103 ते 113), भाजप (124 ते 134), काँग्रेस (8 ते 14), अपक्ष (6 ते 12)
 • इंडिया टीव्हीः सप (133 ते 149), बसप (95 ते 111), भाजप (134 ते 150), काँग्रेस (5 ते 13), अपक्ष (4 ते 12)
 • इंडिया टुडेः सप (94 ते 103), बसप (115 ते 124), भाजप (170 ते 183), काँग्रेस (8 ते 12), अपक्ष (2 ते 6)

पंजाब

 • मतदानाची तारीखः 4 फेब्रुवारी
 • विधानसभेच्या एकूण जागा: 117 
 • बहुमतासाठीः 59 जागा
 • लोकसभेच्या एकूण जागाः 13
 • विद्यमान मुख्यमंत्रीः प्रकाशसिंह बादल 
 • पक्षः शिरोमणी अकाली दल
 • सध्या कोणाची सत्ता आहेः शिरोमणी अकाली दल व भाजप

मागील निवडणूकीत पक्षांना मिळालेल्या जागाः 

 • शिरोमणी अकाली दलः 56
 • भाजपः 12 आमदार
 • काँग्रेसः 46 आमदार

राज्यासमोरील आव्हाने/प्रमुख समस्याः

 • शिरोमणी अकाली दल, भाजप व काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांसह आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख आव्हान
 • 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपचे 4 खासदार निवडून आले
 • अमली पदार्थ्यांच्या विळख्यात अडकलेला पंजाब
 • शिरोमणी अकाली दलाची प्रतिमा यामुळे मलिन
 • अर्थमंत्री अरुण जेटलींना हरविणाऱ्या अमरिंदर सिंग यांच्याकडे काँग्रेसची धुरा 
 • भाजपकडे सक्षम चेहरा नसल्याने त्यांना मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही
 • मतदारांमध्ये शिख समुदायाची संख्या 58 टक्के शिख चेहऱ्यालाच प्राधान्य मिळण्याची शक्यता
 • क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांच्या पत्नीची भूमिकाही महत्त्वाची 
 • सिद्धूकडून भाजपला सोडचिठ्ठी देऊन आवाज-ए-पंजाब पक्षाची स्थापना 
 • सिद्धूंच्या पक्षाची काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची शक्यता

मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदारः

 • प्रमुख उमेदवारः शिरोमणी अकाली दलाचे सध्याचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल 
 • त्यांचा मुलगा सुखबीरसिंग बादल 
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदरसिंग 
 • आपचे भगवंत मान किंवा गुरप्रीतसिंग घुग्गी

ओपिनियन पोलचे अंदाजः

 • इंडिया टुडेः शिरोमणी व भाजप (17 ते 21), काँग्रेस (49 ते 55), आप (42 ते 46)
 • व्हीडीपी असोसिएट्सः शिरोमणी व भाजप (6), काँग्रेस (15), आप (93)
 • टीव्ही 24 इंडियाः शिरोमणी व भाजप (20 ते 25), काँग्रेस (27 ते 35), आप (70 ते 80)
 • सी व्होटरः शिरोमणी व भाजप (6 ते 12), काँग्रेस (8 ते 14), आप (94 ते 100)

गोवा

 • मतदानाची तारीखः 4 फेब्रुवारी
 • एकूण जागा किती : 40 
 • बहुमतासाठीः 21 जागा
 • लोकसभेच्या एकूण जागाः 2
 • विद्यमान मुख्यमंत्रीः लक्ष्मीकांत पार्सेकर
 • पक्षः भारतीय जनता पक्ष 
 • सध्या कोणाची सत्ता आहे : भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमतंक पक्ष 

मागील निवडणूकीत पक्षांना मिळालेल्या जागाः 

 • भाजपः 21
 • महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षः 3
 • काँग्रेसः 9
 • गोवा विकास पक्षः 2
 • अपक्षः 5 

राज्यासमोरील आव्हाने/प्रमुख समस्याः 

 • आम आदमी पक्ष, शिवसेनाही निवडणूकीच्या रिंगणात उतरणार 
 • इंग्रजी माध्यमातील शाळांच्या अनुदानाच्या मुद्यावरून गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर भाजपमधून बाहेर
 • वेलिंगकरांकडून गोवा सुरक्षा मंच पक्षाची स्थापना. 
 • शिवसेना आणि अन्य स्थानिक पक्षासोबत युतीसाठी वेलिंगकरांचे प्रयत्न
 • आम आदमी पक्षाच्या 36 आणि शिवसेनेच्या 3 उमेदवारांचे नावे जाहीर 
 • संरक्षण मनोहर पर्रीकर यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक 
 • कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची समस्या 

मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार: 

 • एल्व्हिस गोम्स (आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार) 
 • राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून फुटलेले सुभाष वेलिंगकर
 • सुदीन ढवळीकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष)
 • विश्वजित राणे (काँग्रेस)
 • फ्रान्सिस डिसुझा (काँग्रेस)

उत्तराखंड

 • मतदानाची तारीखः 15 फेब्रुवारी
 • एकूण जागा: 70
 • बहुमतासाठीः 36 जागा
 • लोकसभेच्या एकूण जागाः 5
 • विद्यमान मुख्यमंत्रीः कोणत्या पक्षाचा? : हरीश रावत
 • सध्या कोणाची सत्ता आहे : काँग्रेस 

मागील निवडणूकीत पक्षांना मिळालेल्या जागाः 

 • काँग्रेसः 36
 • भाजपः 19
 • बहुजन समाज पक्षः 8
 • उत्तराखंड क्रांती दलः 4
 • अपक्षः 3
 • निलंबित आमदारः 11 (काँग्रेस -10, भाजप-1) 

राज्यासमोरील आव्हाने/प्रमुख समस्या:

 • सरकारवरील अविश्‍वास दर्शक ठरावावरून मागील काही महिन्यांत राज्यांत राजकीय खळबळ. त्यातून पुन्हा एकदा काँग्रेसच सत्तेवर. या प्रकरणामुळे 11 आमदारांचे निलंबन. 
 • राजकीय अस्थिरतेची परंपरा. वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती. बेरोजगारीची मोठे आव्हान. 
 • पर्वतीय क्षेत्र, हवामानातील बदलांमुळे कृषी क्षेत्रासमोर मोठ्या समस्या. 
 • पुरुषांच्या मद्यपानामुळे कौटुंबिक कलह, महिलांवर कुटुंबाची जबाबदारी. त्यामुळे आरोग्याच्या समस्या. अपुऱ्या वैद्यकीय व्यवस्था. 

मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार: 

 • हरिष रावत, काँग्रेस
 • भाजपचे भुवनचंद्र खंडुरी, विजय बहुगुणा, भगत सिंग कोशियारी, रमेश पोखरीयाल निशांक

मणिपूर 

 • मतदानाची तारीखः 4 आणि 8 मार्च
 • एकूण जागा: 60
 • बहुमतासाठीः 31 जागा
 • लोकसभेच्या एकूण जागाः 2
 • विद्यमान मुख्यमंत्रीः ओकराम इबोबी सिंह
 • पक्षः काँग्रेस 
 • सध्या कोणाची सत्ता आहे: काँग्रेस 

मागील निवडणूकीत पक्षांना मिळालेल्या जागाः 

 • काँग्रेसः 50
 • भारतीय जनता पक्षः 1
 • नागा पिपल्स फ्रंटः 4,
 • रिक्त जागाः 5 

राज्यासमोरील आव्हाने/प्रमुख समस्या: 

 • फुटीरतावाद्यांची मोठी चळमळ 
 • आदिवासी समुदायाची लोकसंख्या अधिक, आदिवासी समुदायाच्या 30 जमाती 
 • सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याला (आस्पा) मोठा विरोध 

मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदारः 

 • आस्पाच्या कट्टर विरोधक इरोम शर्मिला निवडणूकीच्या रिंगणात उतरणार 
 • बॉक्सिंगपटू मेरी कोम यांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरवण्यासाठी भाजपचे प्रयत्न
Web Title: Uttar Pradesh, Punjab, Goa, Manipur, Uttarakhand assembly elections from February 4