उत्तर प्रदेशात 'हाता'ने लावला 'सायकल'ला ब्रेक

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

लखनौ- उत्तर प्रदेशात झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या हातामुळे समाजवादी पक्षाच्या सायकलला ब्रेक लागल्याची चर्चा सोशल नेटवर्किंगवर सुरू झाली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून टीका सुरू केली आहे.

लखनौ- उत्तर प्रदेशात झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या हातामुळे समाजवादी पक्षाच्या सायकलला ब्रेक लागल्याची चर्चा सोशल नेटवर्किंगवर सुरू झाली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून टीका सुरू केली आहे.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, काँग्रेस व बहुजन समाज पक्षाने एकत्रित येऊन आघाडी केली. परंतु, मतदारांनी त्यांना स्पष्टपणे नाकारले आहे. समाजवादी पक्षाने काँग्रेसबरोबर आघाडी केली नसती तर समाजवादी पक्षाला जास्त जागांवर यश मिळाले असते. परंतु, आघाडी केल्यामुळे समाजवादी पक्षाच्या जागा कमी झाल्या आहेत. बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांच्या हत्तीला तर मतदारांनी झोपवलेच आहे. उत्तर प्रदेशातील मतदारांनी सायकल पंक्चर केली. हत्तीला झोपवले तर पंजाला 'थाप' मारली, असे नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले आहेत.

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी डिंपल यादव, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या सभा झाल्या. डिंपल यादव तर स्टार प्रचारक ठरल्या होत्या. नागरिकांनी सभांना मोठी गर्दी केली होती. गर्दीवरून आघाडीला मोठे यश मिळेल, असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, हा अंदाज पुर्णपणे खोटा ठरला आहे. राहुल गांधी यांनी थेट मतदारांशी चर्चा करण्यासाठी खाट सभा घेतल्या. त्यांच्या सभा झाल्यानंतर नागरिकांनी खाटा पळविल्या. संबंधित बातम्या प्रसारमाध्यमांमधून दाखविण्यात आल्या. खाटा पळविल्यामुळे राहुल गांधी हे जोरदार चर्चेत आले होते. मात्र, मतदारांनी खाटांबरोबरच राहुल गांधींनाही पळवून लावल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे राज्याची सूत्रे नागरिकांनी सोपवली आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आल्यास विकास होऊ शकेल, याकडेच नागरिक वळल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने गांधी घराण्याच्या मतदार संघामध्ये एवढे मोठे यश प्रथमच मिळविले आहे. यामुळे समाजवादी पक्ष व काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.

समाजवादी व काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे युवा चेहरे असतानाही मतदारांनी त्यांना नाकारले आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव या पिता-पुत्रामधील राजकीय भांडण हे केवळ दिखावूपणाचे होते, हे मतदारांनी वेळीच ओळखले होते. पक्षाला या भांडणाचाही फटका बसल्याचे बोलले जात आहे. समाजवादी पक्ष, काँग्रेस व बुहजन समाज पक्षाच्या नेत्यांची एकत्रित येऊन नेमके काय चुकले? यावर चर्चा करण्यापलिकडे आता हाती काहीच उरले नाही.

Web Title: uttar pradesh: rahul gandhi and akhilesh yadav