उत्तर प्रदेशात पावसाचे थैमान, आत्तापर्यंत 106 जणांचा मृत्यू 

पीटीआय
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

लखनौ (पीटीआय) : उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत पावसामुळे 14 जण मरण पावले, तर अन्य सात जण जखमी झाले. आतापर्यंत पावसामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या आता 106 वर पोचली आहे, असे अधिकृत सूत्रांनी आज सांगितले. 

यासंदर्भात मिळालेल्या वृत्तानुसार फरुखाबाद आणि बहारीच येथे प्रत्येकी दोन जण मरण पावले, तर खेरी, रायबरेली, लखनौ, कानपूर देहात, बाराबंकी, सीतापूर आणि सुलतानपूर भागात प्रत्येकी एक जण मरण पावला आहे. त्याचप्रमाणे शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच 80 जनावरे मरण पावली असून, 600 घरांचे नुकसान झाले आहे. एक जुलैपासून पावसामुळे मरण पावलेल्यांची संख्या 148 झाली आहे. यातील बहुतांश मृत्यू हे भिंत किंवा घर कोसळून, झाडे उन्मळल्याने झाल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले. नागरिकांना सतर्क राहण्यास सांगावे तसेच पूर प्रभावित भागात नागरिकांनी जाऊ नये, याबाबत अधिकाऱ्यांनी नागरिकांना सूचना कराव्यात, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. 

Web Title: Uttar Pradesh rains, 106 dead death so far