राजभवन स्फोटकांनी उडविण्याची धमकी

वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेले राजभवन स्फोटकांनी उडविण्याची धमकी मिळाली आहे. दहशतवादी संघटना "टीएसपीसी'ने ही धमकी पत्राद्वारे दिली असून, राज्यपालांनी दहा दिवसांत राजभवन रिकामे केले नाही, तर ते उडविण्याची धमकी दिली आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेले राजभवन स्फोटकांनी उडविण्याची धमकी मिळाली आहे. दहशतवादी संघटना "टीएसपीसी'ने ही धमकी पत्राद्वारे दिली असून, राज्यपालांनी दहा दिवसांत राजभवन रिकामे केले नाही, तर ते उडविण्याची धमकी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे अतिरिक्त मुख्य सचिव हेमंत राव यांनी याला दुजोरा दिला असून, गृह विभागाला पत्र पाठविले आहे. पोलिसही दक्ष झाले आहेत. उत्तरप्रदेशमधील राजभवन स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी दहशतवादी संघटनेकडून मिळाल्यावर पोलिस यंत्रणा दक्ष झाली असून दहशतवादी संघटनेकडून पुढील दहा दिवसांत राजभवन रिकामे करण्याची मागणी या संघटनेकडून करण्यात आली आहे.

सुप्रिया सुळेंची वडिलांवर भावूक पोस्ट; म्हणतात, श्रमलेल्या बापासाठी...

दरम्यान, आनंदीबेन पटेल या उत्तरप्रदेशच्या राज्यपाल होण्यापूर्वी मध्यप्रदेशच्या राज्यपाल होत्या. तसेच, त्यांच्यावर छत्तीसगडचाही अतिरिक्त कार्यभार काही दिवसांसाठी सोपविण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttar Pradesh Raj Bhavan gets threat letter