सावधान! ई-रिक्षाचा स्फोट झाल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे होरपळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! ई-रिक्षाचा स्फोट झाल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे होरपळले

सावधान! ई-रिक्षाचा स्फोट झाल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे होरपळले

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशमधल्या घटनेने देशात खळबळ उडाली आहे. एका ई-रिक्षाचा स्फोट झाल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून दोघेजण होरपळले आहेत.

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये ही हादरवून सोडणारी घटना घडली आहे. सध्या सर्वत्र चार्जिंगवरील वाहनांचा बोलबोला आहे. परंतु काही दुर्दैवी घटनांमुळे ग्राहक साशंकतेने अशा वाहनांकडे बघत आहेत. यापूर्वी इलेक्ट्रिक वाहनांनी पेट घेतल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता थेट स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे.

लखनऊच्या बीबीडी भागातमध्ये एका घरात रिक्षाची बॅटरी चार्जिंगला लावली होती. त्याचदरम्यान बॅटरीचा मोठा स्फोट झाला. या घटनेत एक २५ वर्षीय महिला, तीन वर्षांचा मुलगा आणि महिलेच्या भाचीचा मृत्यू झाला आहे. तर महिलेचा पती आणि दुसरी भाची गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेनंतर पाचही जणांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.परंतु तिघांचा मृत्यू झाला. महिलेचा पती अंकित हा लखनऊमध्ये रिक्षा चालवत होता. त्याचीच बॅटरी चार्जिंगसाठी लावली असता तिचा स्फोट झाला.

टॅग्स :Uttar Pradeshblast