उत्तर प्रदेशला गैरव्यवहार नको;कमळ हवे: मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

उत्तर प्रदेशमध्ये भाजपची लाट इतकी सामर्थ्यशाली आहे; की भेदरलेले मुख्यमंत्री या लाटेत वाहून जाण्याच्या भीतीमुळे मिळेल तो आधार घेत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये टिकून राहण्यासाठीच सपला कॉंग्रेसची मदत घ्यावी लागली आहे

अलिगड - "उत्तर प्रदेश राज्यास आता गैरव्यवहार नको; तर कमळ हवे,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) राज्यातील मतदारांना भारतीय जनता पक्षास (भाजप) निवडून देण्याचे आवाहन केले. "उत्तर प्रदेशने मला इतके काही दिले आहे; मलाही या राज्यासाठी काम करण्याची इच्छा आहे,' अशी भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

मोदी म्हणाले -

  • गेल्या 70 वर्षांत देशातील 18 हजार गावांमध्ये वीज आली नाही. यांमध्ये बहुसंख्य गावे ही उत्तर प्रदेशमधील होती. आम्ही वीजपुरवठ्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले
  • ग्रामीण भारत "धूरमुक्त' करणे हे आमचे ध्येय आहे. यासाठी आम्ही "उज्वल योजने'ची अंमलबजावणी सुरु केली. देशातील गरीबांना आम्ही "गॅस जोडणी' पुरवित आहोत
  • देशातील तरुणाईची भरभराट व्हावी, या हेतुखातर आम्ही मुद्रा योजना लागू केली. या योजनेंतर्गत आम्ही त्यांना कर्जपुरवठा करत आहोत.
  • गुंडांना आश्रय देणाऱ्या राजकीय नेत्यांची हकालपट्टी केल्यास महिलांसाठी सुरक्षित वातावरण आपोआप तयार होईल
  • उत्तर प्रदेशमध्ये भाजपची लाट इतकी सामर्थ्यशाली आहे; की भेदरलेले मुख्यमंत्री या लाटेत वाहून जाण्याच्या भीतीमुळे मिळेल तो आधार घेत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये टिकून राहण्यासाठीच सपला कॉंग्रेसची मदत घ्यावी लागली आहे
  • उत्तर प्रदेशमधील भाजपच्या विकास कार्यक्रमाचा भर वीज, कायदा व सुव्यवस्था आणि रस्त्यांवर असणार आहे
  • राज्यामध्ये समाजवादी पक्ष व कॉंग्रेस पक्षाची युती सरकार बनविण्यासाठी झालेली नाही. मोदी यांची सत्ता आल्यास ते भ्रष्टाचार नष्ट करतील, अशी खात्री असल्यानेच ही सप-कॉंग्रेस युती झाली आहे
  • उत्तर प्रदेश राज्यामधील नागरिकांमधील उत्साह पाहून त्यांना बदल हवा आहे,याची खात्री वाटते
Web Title: Uttar Pradesh wants "Lotus': Modi