उत्तर प्रदेशमध्ये महिलेची पोलिस स्थानकात हत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मैनपुरी (उत्तर प्रदेश): स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिस स्थानकाचा आसरा घेतलेल्या महिलेची पोलिसांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना उत्तर प्रदेशमधील मैनपुरी पोलिस स्थानकात सोमवारी (ता.17) रात्री घडली.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्यात कायदा व सुव्यवस्था सुधारेल, अशी अपेक्षा जनतेची होती. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी उपायही सुरू केले असले तरी, गुंडांवर जरब बसली नसल्याचेच या घटनेतून दिसून येते. संबंधित महिलेच्या कुटुंबाचे दुसऱ्या एका कुटुंबाशी जमीन व मालमत्तेवरून वाद होते. त्यातून सोमवारी रात्री उशिरा दोन्ही कुटुंबांत रस्त्यावरच भांडणे झाली. संबंधित महिला संरक्षण मागण्यासाठी मैनपुरी पोलिस स्थानकात आली. तिच्या मागोमाग मारेकरीही तेथे आला. त्याने अगदी जवळून तिच्यावर गोळ्या झाडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मारेकऱ्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत पोलिस स्थानकात जमलेल्या जमावाने त्याला पकडून बेदम मारहाण केली व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी 11 जणांना अटक झाली आहे.

Web Title: uttar pradesh: Woman killed in police station