esakal | Uttarakhand: उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, नौदलाचे ५ जवान बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, नौदलाचे ५ जवान बेपत्ता

उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, नौदलाचे ५ जवान बेपत्ता

sakal_logo
By
दत्ता लवांडे

उत्तराखंड : ऊत्तर भारतात हिमस्खलन होण्याच्या घटना नवीन नाहीत, अश्या घटनांमधून भारतीय सैन्यातील अनेक जवानांना आपले जीव गमवावे लागले आहेत. पावसाळ्यात हिमस्खलनाच्या घटना घडण्याचे प्रमाण अधिक असते. अश्या घटना घडत असतानाच उत्तराखंडमधील चमोली येथे भारतीय नौदलातील जवानांसोबत ही दुर्दैवी घटना घडली आहे. चमोली येथे हिमस्खलन होऊन त्रिशुळ पर्वतावर चढाई करत असलेल्या भारतीय नौदलाचे ५ जवान १ पोर्टर बेपत्ता आहे. भारतीय नौदलाच्या गिर्यारोहक दलाला या घटनेमुळे फटका बसला आहे. सूत्रांच्या माहीतनुसार नौदलाचे २० जणांचे पथक त्रिशुळ पर्वतावर चढाई करत असताना सकाळी साधारण साडेपाच वाजता पथकातले ५ जण आणि त्यांच्यासोबत चालणारा एक पोर्टर अचानक हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडले.

हेही वाचा: ग्वालियार : बस कंटेनरच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू, १५ गंभीर

या घटनेनंतर सर्व सहा जण बेपत्ता असून भारतीय नौदल आणि प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली असून अद्याप कुणाचााही शोध लागला नाही. नेहरू गिर्यारोहक संस्थेच्या बचाव पथकालाही त्रिशूळ पर्वतावर शोधमोहीमेसाठी पाठवले आहे.

१५ दिवसांपूर्वी पथक झाले होते रवाना

नौदलाचे हे पथक १५ दिवसांपूर्वी ७ हजार १२० मीटर ऊंची असलेल्या त्रिशुळ पर्वतावर चढाईसाठी रवाना झाले होते. शुक्रवारी पथक जेव्हा पुढे गेले तेव्हा त्यांना बर्फाच्या वादळाचा सामना करावा लागला, पथकातील ५ जवान आणि १ पोर्टर यामध्ये बेपत्ता झाले आहेत. तसेच नौदल आणि प्रशासनातर्फे शोधमोहीम चालू आहे.

loading image
go to top