कॅबिनेट मंत्री आढळला कोरोना पॉजिटिव्ह; मुख्यमंत्र्यांना केले क्वारंटाईन

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जून 2020

उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज हे कोरोना पॉजिटिव्ह आढळून आल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि आणखी काही मंत्र्यांना होम क्वारांटाईन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज हे कोरोना पॉजिटिव्ह आढळून आल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि आणखी काही मंत्र्यांना होम क्वारांटाईन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सतपाल महाराज हे २९ मे रोजी झालेल्या कॅबिनेट मिटींगला हजर होते. सतपाल महाराज यांच्यावर ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात उपचार चालू आहेत. सतपाल महाराजांसोबत त्यांच्या कुटुंबातील आणखी ५ लोकांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सतपाल महाराज यांच्या पत्नी अमृता रावत यांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आल्यानतंर सतपाल महाराज याची टेस्ट करण्यात आलील होती, त्यानंतर त्यांचीही टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे.
------
कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता सातव्या स्थानी; कोणाला टाकले मागे?
------
आंदोलन चिघळले; ट्रम्प व्हाईट हाऊसमल्या संरक्षण बंकरमध्ये हलविले
------
दरम्यान, उत्तराखंडमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या रविवारी एकूण १५८ने वाढ झाली असून आता कोरोनाग्रस्तांचा उत्तराखंडमधील एकूण आकडा ९०७वर पोहोचला आहे. उत्तराखंड आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक ४९ नवे रुग्ण देहरादूनमध्ये सापडले आहेत. तर नैनीतालमध्ये ३१, उधम सिंह नगरमध्ये २०, अल्मोडामध्ये १८, हरिद्वारमध्ये १७, उत्तरकाशीमध्ये ०७, पौडी गढवालमध्ये ०६, चंपावतमध्ये ०४ तर टिहरीमध्ये ०३, चमोलीमध्ये ०२ आणि रूद्रप्रयागमध्ये एक नवा रुग्ण समोर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttarakhand CM two ministers to be put under quarantine