उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; शिक्षणमंत्र्यांचा मुलगा ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

- उत्तराखंडमध्ये झाला हा भीषण अपघात.

- शिक्षणमंत्र्यांचा मुलगा अपघातात ठार.

देहरादून : उत्तराखंडमधील फरिदपूर येथे भीषण अपघात झाला. या अपघातात भाजप नेते आणि उत्तरखंडचे शिक्षणमंत्री अरविंद पांडे यांच्या मुलगा अंकुर यामध्ये ठार झाला. हा अपघात आज (बुधवार) पहाटे तीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 24 वर झाला. 

अरविंद पांडे हे उत्तरखंडचे शिक्षणमंत्री आहेत. त्यांचा मुलगा अंकुर आपल्या मित्राच्या लग्नाला जाण्यासाठी चारचाकी वाहनाने प्रवास करत होता. त्यांची कार पहाटे तीनच्या सुमारास फरिदपूर येथील राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना कार आणि ट्रकची समोरासमोर धडक बसली आणि हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, की कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर अंकुर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांच्यासह उत्तराखंडच्या मंत्र्यांनी शोक व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttarakhand Education Minister son dies in road mishap in Bareilly