Uttarakhand Glacier : तपोवन धरण नेस्तनाबूत; 170 कामगार बेपत्ता

tapovan dam
tapovan dam

जोशीमठ :  उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये रविवारी सकाळी जवळपास 10.30 वाजता नंदादेवी ग्लेशियरच्या कोसळण्याने धौलीगंगा नदीमध्ये अचानकच पूर आला आहे. या दुर्घटनेमध्ये एका जलविद्युत प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या जवळपास 170 श्रमिक बेपत्ता आहेत. आतापर्यंत 10 लोक यात मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. ग्लेशियर कोसळल्याने एका पॉवर प्रोजेक्टवर देखील याचा गंभीर परिणाम झाला आहे. भारतीय सैन्यासमवेत अनेक दल बचाव कार्यामध्ये सध्या कार्यमग्न आहेत. काल रात्री देखील बचावकार्य सुरु  होतं. वायुसेनेशी निगडीत सुत्रांनी माहिती दिलीय की,  तपोवन विष्णुगाढ हायड्रो पॉवर प्लांट पूर्णपणे या दुर्घटनेमध्ये नेस्तनाबूत झाला आहे. 

याबाबतचे फोटो स्पष्ट करत आहेत की धौलीगंगा आणि ऋषिगंगा नदीवरील धरम पूर्णपणे नष्ट झाले आहे. हा भाग राजधानी देहरादूनपासून जवळपास 280 किमी दूर आहे. तपोवनजवळील मलारी घाटाच्या सुरवातीलाच बनलेले दोन पूल देखील नष्ट झाले आहेत. जोशीमठ आणि तपोवनाच्या दरम्यानच्या रस्त्यावर याचा कसलाही परिणाम झाला नाहीये. प्रशासनाकडून लोकांना बचावकार्य देणे सुरु आहे. 

दुर्घटनेनंतर सगळीकडे कचराच कचर दिसून येतो आहे. NTPC अधिकाऱ्यांनी या प्रोजेक्टबाबत माहिती देताना सांगितलं की, तपोवन हायड्रो-इलेक्ट्रिक प्रोजेक्टमध्ये 520 मेगावॅट वीजेची निर्मिती सुरु होती. यासाठी 3 हजार कोटी रुपये गुंतवले होते. साईटवर काम करणारे जवळपास 170 कामगार बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. NDRF, SDRF, ITBP, सैन्य आणि वायुसेनेसमवेत अनेक मदतनीस दल बचावकार्य करत आहेत. बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com