उत्तराखंडमध्ये ढगफुटीने सहा जण मृत्युमुखी

पीटीआय
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि राज्य आपत्ती निवारण पथक यांना घटनास्थळावरून एक मृतदेह सापडला असून लष्कराचा जवान अद्यापही बेपत्ता असल्याचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आशिष चौहान यांनी सांगितले

पिठोरगड - उत्तराखंडच्या धारचुला उपविभागात आज ढगफुटीच्या दोन घटनांमध्ये सहा जण मृत्युमुखी पडले; तर लष्कराचा एक जवान बेपत्ता झाला. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारचुलाचा उपविभाग असलेल्या तवाघाटाजवळ मंगती नुल्लाह येथे घडली.

मुसळधार पावसामुळे नद्यादुथडी भरून वाहू लागल्या. त्याचा तडाखा काही दुकानांना बसला त्याचप्रमाणे लष्कराची छावणीही नाल्याखाली गेली. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि राज्य आपत्ती निवारण पथक यांना घटनास्थळावरून एक मृतदेह सापडला असून लष्कराचा जवान अद्यापही बेपत्ता असल्याचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आशिष चौहान यांनी सांगितले.

मालपाजवळ ढगफुटीची दुसरी घटना घडली. तेथे एका पाण्याच्या प्रवाहात चार जण वाहून गेले. आपत्ती निवारण पथकालानंतर चार जणांचा मृतदेह सापडले त्यातील एकाला वाचविण्यात यश आले. पिढोरगडचे जिल्हा दंडाधिकारी म्हणाले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्याबरोबर आम्ही लष्कराला आणि भारत तिबेट सीमा सुरक्षा दलाला बचाव आणि मदत कार्यात हातभार लावण्यास विनंती केली आहे.

Web Title: Uttarakhand: Six dead as two landslides hit Pithoragarh