esakal | ‘यूपी’साठी काँग्रेसचा बारा हजार किलोमीटर प्रवासाचा संकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

congress

‘यूपी’साठी काँग्रेसचा बारा हजार किलोमीटर प्रवासाचा संकल्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनौ : उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीसाठी सज्ज होत असलेल्या काँग्रेस पक्षाने यात्रेचा मंत्र वापरायचे ठरविले आहे. १२ हजार किलोमीटर यात्रेचा संकल्प सोडण्यात आला असून याचा सविस्तर तपशील लवकरच जाहीर होईल.

पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी गुरुवारी उत्तर प्रदेशात दाखल झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील वर्षातील विधानसभा निवडणूकीसाठी कसून तयारी सुरु आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या सल्लागार व धोरण समिती सदस्यांची बैठक झाली. त्यावेळी विधानसभेतील पक्षाच्या नेत्या आराधना मिश्रा, प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू आणि वरिष्ठ नेते प्रमोद तिवारी हे उपस्थित होते.

हेही वाचा: गुगल लेन्सच्या मदतीने आपण गणिताचे प्रश्न सोडवू शकता

काँग्रेस प्रतिग्या यात्रा - हम वचन निभाएंगे असे यात्रेचे नामकरण करण्यात आले. यात्रेच्या माध्यमातून खेडेगाव आणि शहरांतील मतदारांशी संवाद साधण्यात येईल. निवडणूकीसाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता पक्ष करेल अशी ग्वाही मतदारांना देण्यात येईल. प्रियांका या दौऱ्यात निवडणूक समितीच्या सदस्यांचीही बैठक घेणार आहेत.

मार्गाबाबत चर्चा

यात्रेचा मार्ग आणि इतर तपशील ठरविण्यासाठी प्रियांका यांनी सल्लागार व धोरण समितीच्या सदस्यांचा अभिप्राय आणि सूचना मागविल्या आहेत.

loading image
go to top