Corona Vaccine
Corona Vaccine

Breaking News : ज्येष्ठांना एक मार्चपासून लस; केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली - कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा एक मार्चपासून सुरू होणार आहे. यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेहासारखे गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येईल. दहा हजार सरकारी आणि २० हजार खासगी लसीकरण केंद्रांमार्फत ही मोहीम राबविली जाणार असून सरकारी केंद्रांवर नागरिकांना ही लस मोफत मिळेल.  खासगी केंद्रांवर मात्र लसीकरणाचे शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क नेमके किती असेल याबाबत निर्माते आणि रुग्णालयांशी चर्चा करून आरोग्य मंत्रालयातर्फे येत्या तीन ते चार दिवसांत कळविले जाईल, असे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये आज हा निर्णय घेण्यात आला. जावडेकर यांनी या बैठकीचा तपशील जाहीर केला. देशात लॅपटॉप, संगणक निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेच्या पुढील टप्प्यालाही केंद्र सरकारने आज संमती दिली आहे.  माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले, की ‘‘ माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित हार्डवेअरच्या उत्पादनांसाठी आर्थिक सवलत देण्यात आली आहे. यात लॅपटॉप, टॅबलेट, आणि ऑल इन वन पीसी, सर्व्हर निर्मितीला प्रोत्साहन दिले जाईल.’’

लॅपटॉप, आयपॉडला मिळणार ‘देसी टच’
लॅपटॉप आणि आयपॉड बनविणाऱ्या जगातील पहिल्या पाच कंपन्यांना भारतात आणण्याचे लक्ष्य असून येत्या पाच वर्षांत ३,२६,००० कोटी रुपयांचे उत्पादन करण्याचे आणि २,४५,००० कोटी रुपयांच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. 

या योजनेसाठी पात्र कंपन्यांना भारतात आगामी चार वर्षांसाठी चार ते दोन टक्क्यांपर्यंत प्रोत्साहन सवलत मिळेल. त्यात पाच परदेशी आणि १० देशांतर्गत कंपन्यांचा समावेश असेल. चार वर्षांसाठी ७ हजार ३५० कोटी रुपये यावर खर्च होतील आणि १.८० लाख प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध यातून निर्माण होतील. तसेच देशांतर्गत मूल्यवर्धनात आयटी हार्डवेअरचे योगदान २० ते २५ टक्क्यांवर जाईल.  यासोबतच २०२०-२१ ते २०२८-२९ या कालावधीसाठी औषध निर्माण क्षेत्रालाही उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेतून मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गुंतवणूक आणि रोजगार वाढविणाऱ्या या योजनेमुळे ग्राहकांना किफायतशीर दरात औषधे उपलब्ध होतील. २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीत २.९४ लाख कोटी रुपयांची विक्री आणि १.९६ लाख कोटी रुपयांची निर्यात होण्याची अपेक्षा आहे. एक लाखाच्या आसपास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, असेही मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

संसर्गाच्या आघाडीवर

  • लातूरमध्ये शनिवार, रविवारी संचारबंदी
  • राज्यात घरगुती विलगीकरणातील रुग्ण वाढले
  • बीड जिल्ह्यातील शाळा १० मार्चपर्यंत बंद
  • हिंगोलीमध्ये रात्रीची संचारबंदी लागू
  • महाराष्ट्रातील एसटींना कर्नाटकात प्रवेश नाही
  • संसर्गामुळे गोकुळची निवडणूक स्थगित
  • सोलापूरमध्ये ७ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी
  • नाशिकमध्ये पोलिसांची रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई

रुग्ण वाढले, चिंताही वाढली
राज्यातील बाधितांची संख्या आज पुन्हा वाढल्याने यंत्रणेच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. राज्यामध्ये आज ८ हजार ८०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ८० जणांचा मृत्यू झाला आहे.  मुंबईमध्येही कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला असून मागील  २४ तासांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. पुण्यामध्ये बाधितांची संख्या वाढली आहे. दरम्यान, वाशीम जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील देगाव येथील निवासी शाळेतील ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी यांना बाधा झाली आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com