"भाजप' मुख्यालयातून वाजपेयींचा "चेहरा' गायब!

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली  - गुजरात दंगलींनंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांना "राजधर्माचे पालन करा,' अशा जाहीर कानपिचक्‍या देणारे माजी पंतप्रधान व भाजपचे भीष्माचार्य अटलबिहारी वाजपेयी यांचे भव्य छायाचित्र भाजप मुख्यालयातील कुशाभाऊ ठाकरे सभागृहातून पुन्हा अदृश्‍य झाले आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीचे निमित्त साधून पक्षाच्या नव्या नेतृत्वाने उपाध्याय यांच्या चित्रांची चक्क पुनरावृत्ती करताना लाखोंच्या गर्दीला संबोधित करणाऱ्या वाजपेयींचे खास मुद्रेतील छायाचित्र गायब केल्याचे दिसते. यावर भाजपने, केवळ या जन्मशताब्दीनिमित्त नवे पोस्टर येथे लावले आहे, त्यातून वेगळा अर्थ काढू नये, असे म्हटले आहे.

"आओ फिर से दिया जलाये' अशी आशा जागविणाऱ्या भारतरत्न वाजपेयींच्या छायाचित्राला दिव्यांच्या उत्सवातच स्वपक्षाच्या मुख्यालयातून पुन्हा गायब केले गेले आहे. मे 2014 मध्ये भाजपची सूत्रे नव्या नेतृत्वाच्या हाती गेल्यापासून वाजपेयी यांचे चित्र मुख्यालयातील सभागृहातून अदृश्‍य होण्याची किमान तिसरी वेळ आहे. यावर चर्चा झाली की पुन्हा वाजपेयींच्या चित्राची प्रतिष्ठापना होते, हा पूर्वानुभव आहे.
पक्षनेते श्रीकांत शर्मा यांच्या म्हणण्यानुसार वाजपेयींचे चित्र गायब केले हे म्हणणे बरोबर नाही. यंदाचे वर्ष हे पंडित उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे असे सांगून ते म्हणाले, की गरिबांचे कल्याण, समर्पण, अंत्योदय या पं. उपाध्याय यांच्या संकल्पनाच भाजप सरकार पुढे नेत आहे व नवे पोस्टर त्यावरच आधारित आहे, त्यातून वेगळा अर्थ काढू नये.

भाजपमध्ये अगदी स्थापनेपासूनच अटल-अडवानी जोडीचे वर्चस्व होते. भाजप मुख्यालयाच्या जुन्या रचनेच्या सभागृहातही वाजपेयी यांचेच भव्य छायाचित्र होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा दिग्गज नेता गेली नऊ वर्षे शरपंजरी आहे. या काळात लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज, जोशी, राजनाथसिंह, नितीन गडकरी, अरुण जेटली या दिग्गजांकडे पक्षाची सूत्रे राहिली. मात्र, वाजपेयींचे छायाचित्र कोणीही काढले नव्हते. गडकरी यांनी अत्याधुनिक कुशाभाऊ ठाकरे सभागृह उभारले तेव्हा उपाध्याय व श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांची छायाचित्रे तेथे होतीच. मात्र, मुख्य छायाचित्र- चेहरा लाखोंच्या गर्दीला संबोधित करणाऱ्या वाजपेयींचाच होता.

Web Title: Vaipayee face missed from BJP head office