उत्तर प्रदेश सचिवालयात उभारणार वाजपेयींचा पुतळा

वृत्तसंस्था
रविवार, 30 डिसेंबर 2018

उत्तर प्रदेश सरकारचे सचिवालय असलेल्या लोकभवनमध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा 25 फुटी पुतळा उभारणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी केली.वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, खासदार आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक उपस्थित होते. 

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारचे सचिवालय असलेल्या लोकभवनमध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा 25 फुटी पुतळा उभारणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी केली.वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, खासदार आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक उपस्थित होते. 

अटलबिहारी वाजपेयी यांचे उत्तर प्रदेशबरोबर घनिष्ठ संबंध होते. बलरामपूर येथून त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरवात केली होती. त्याशिवाय खासदार म्हणून त्यांनी पाच वेळा लखनौचे प्रतिनिधित्व केले होते, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले.

माजी पंतप्रधानांच्या नावाने अनेक नव्या योजना सुरू करण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली. ते म्हणाले, की चांगल्या प्रशासनाची सुरवात अटलजींनी केली होती. दीनदयाळ उपाध्याय आणि श्‍यामा प्रसाद मुखर्जी यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे बारकावे समजून घेतले होते आणि राजकारणात त्यांनी स्वत:बद्दल एक विश्‍वास निर्माण केला होता. वाजपेयी हे लोकशाहीचे सैनिक होते आणि राजकारण्यांमध्ये त्यांनी आपल्या कार्याने एक आदर्श ठेवला होता, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. 

Web Title: Vajpayees statue to be installed in UP secretariat declares Yogi Adityanath