Valentines Day: प्रेमोत्सवाला सुरुवात! 'व्हॅलेन्टाईन्स डे' नेमका आहे तरी काय?

Valentines Day: आज जगभरात प्रेमाचा दिवस अर्थात 'व्हॅलेन्टाईन्स डे' साजरा होत आहे.
Valentines Day
Valentines DaySakal

गेले अनेक दिवस जगभरातील तमाम प्रेमपुजारी ज्या दिवसाची वाट पाहत होते, तो सोन्याचा दिवस अखेर उजाडला. आज जगभरात प्रेमाचा दिवस अर्थात 'व्हॅलेन्टाईन्स डे' (Valentines Day) ला सुरुवात झाली आहे. हा दिवस जगभरात एखादा सण म्हणून साजरा केला जातो. अनेकजण आजचा दिवस आपल्या जोडीदारासोबत (Lover) घालवतात. त्यांना आकर्षक भेटवस्तू देतात. प्रेमाच्या शपथा घेतल्या जातात. आयुष्यभराची सोबत देण्याची प्रतिज्ञा केली जाते. एकंदरीतच हा दिवस आनंदाचा असतो. (Unknown things and history of Valentines Day)

Valentines Day
Valentines Day: ट्विटरवाली लव्हस्टोरी; एका ट्वीटने फिट झाल्या अनेक प्रेमकथा

व्हॅलेन्टाईन डे तसा जगभर साजरा केला जातो. परंतु अनेकांना तो साजरा का केला जातो याचीच माहितीच नाही. हा दिवस आज आपण साजरा करतो, यात खूप काही दडलंय. 'व्हॅलेन्टाईन डे'ची कहाणीही तितकीच रंजक आहे. आज आपण प्रेमाच्या दिवसाच्या महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती घेणार आहोत.

'व्हॅलेन्टाईन्स डे'ची कहाणी (Story of Valentines Day)-

जागतिक प्रेमदिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे संत व्हॅलेंटाईन यांच्या नावाने साजरा केला जातो. संत व्हॅलेंटाईन यांच्या विषयी अनेक गोष्टी प्रचलित आहेत पण सर्वात लोकप्रिय कथा रोमन किंग क्लॉडियस आणि संत व्हॅलेंटाईन यांची आहे. रोमन किंग क्लॉडियसने याच्या काळात आपल्या सैनिकांना लग्न करण्यास मनाई केली होती, पण संत व्हॅलेंटाईनने अनेक सैनिकांना लग्नासाठी तयार केले आणि त्यांचे लग्न लावून दिले. आपण आपल्या सैनिकांसाठी केलाला आदेश पायदळी दुडवल्याचा रोमन किंगला राग आला आणि त्याने रागाच्या अहंकारात 14 फेब्रुवारी 269 रोजी संत व्हॅलेंटाईनला फाशीवर चढवलं. त्यापुर्वी 14 फेब्रुवारीला रोममध्ये ‘Lupercalia’ नावाचा उत्सव साजरा केला जायचा. या उत्सवात मुले बॉक्समधून मुलींच्या नावाच्या चिढी काढत असत. उत्सवा दरम्यान ही जोडपी प्रेयसी-प्रियकर बनून फिरत असत आणि कधी कधी ते लग्नबंधनात देखील बांधली जात अशी गोष्ट आहे. नंतर पुढे चर्चमध्ये हा दिवस ख्रिश्चन उत्सव म्हणून आणि संत व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करण्यास सुरूवात झाली. आणि मग लोक आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी संत व्हॅलेंटाईन नावाचा वापर करू लागले.

Valentines Day
'बरं झालं तू नकार दिलास..! एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराचं लव्हलेटर

कुणासोबत साजरा करायचा?-

तसं पाहिलं तर व्हॅलेन्टाईन्स डे आपल्या जोडीदारासोबत साजरा केला जातो. हीच मूळ संकल्पना आहे. परंतु काही लोक यादिवशी आपल्यावर जीव लावणाऱ्या इतर कोणत्याही नात्यासोबत तो साजरा करतात. तुमच्यावर जीव लावणारा मित्र, तुमच्यासाठी अहोरात्र झटणारे माता हे सगळे तुमचे व्हॅलेन्टाईनच आहेत. एवढेच नव्हे तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत तुम्ही हे आनंदाचे क्षण साजरे करू शकता. त्यांचे आभार मानू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com