बदायूँमध्ये डॉ. बाबासाहेबांचा पुतळा भगव्या रंगात!

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 एप्रिल 2018

'राज्य सरकार हे रंगांचे राजकरण करण्यात व्यस्त आहे. काही इमारती, कंपाऊंड, रस्त्यावरील पट्टे, उद्यानेही भगव्या रंगात रंगविण्याचे काम येथे चालू आहे. आता आंबेडकरांच्या पुतळ्यालाही भगवा रंग दिल्यामुळे ही गोष्ट प्रकर्षाने समोर आली आह,' असे समाजवादी पक्षाचे आमदार व प्रवक्ते सुनिल सिंह साजन यांनी सांगितले.  

बदायूँ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बदायूँ येथे काही दिवसांपूर्वी समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना केली होती. त्यानंतर काही काळाने पुतळा तेथे पुन्हा बसविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा पुतळा भगव्या रंगाच्या वस्त्रात बसविण्यात आला आहे. 

बदायूँमधील लोकांनी निषेध केल्यानंतर प्रशासनाने हा पुतळा पुन्हा बसविला. अलीकडेच बदायूँमधील दुग्रैय्या गावातील आंबेडकर पार्कमध्ये हा पुतळा गावकऱ्यांना तुटलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर पुतळा पुन्हा बसविण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली, पण हा पुतळा भगव्या रंगात बसविल्यामुळे परत एकदा चर्चांना उधाण आले आहे. 

'राज्य सरकार हे रंगांचे राजकरण करण्यात व्यस्त आहे. काही इमारती, कंपाऊंड, रस्त्यावरील पट्टे, उद्यानेही भगव्या रंगात रंगविण्याचे काम येथे चालू आहे. आता आंबेडकरांच्या पुतळ्यालाही भगवा रंग दिल्यामुळे ही गोष्ट प्रकर्षाने समोर आली आह,' असे समाजवादी पक्षाचे आमदार व प्रवक्ते सुनिल सिंह साजन यांनी सांगितले.  

मागच्याच महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सरकारी कागदपत्रांवर, शासकीय इमारतींना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असा देण्याचा निर्णय राज्यपाल राम नाईक यांनी दिला होता. त्याप्रमाणे सर्वांना सूचनाही देण्यात आल्या.  

या सर्व प्रकारानंतर बसपच्या कार्यकर्त्यांनी भगव्या रंगातील पुतळा पुन्हा निळ्या रंगात रंगविल्याचे समजते. 

पुतळा तोडफोडीचे हे सत्र त्रिपुरामधील लेनिनचा पुतळा हटविल्यापसून मोठ्या प्रमाणात सुरू झाले. यानंतर अनेक महापुरूषांच्या पुतळ्यांची तोडफोड करण्यात आली. पण आता हेच पुतळे पुन्हा बसविताना रंगाच्या राजकारणाला सुरूवात झाली आहे.  

Web Title: Vandalised Ambedkar statue restored in Badaun painted in saffron