Vande Bharat Express : कधी बैल तर कधी म्हैस; सुरू झाल्यापासून वंदे भारत एक्सप्रेसचा चक्काचूर!

केवळ वंदे भारतच नाही तर भारतातील सर्व प्रकारच्या ट्रेन जनावरांना धडकतात
Vande Bharat Express
Vande Bharat Expressesakal

वंदे भारत’च्या प्रवासाची पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  स्थानकावर याचे उद्घाटन करणार आहेत. आज मुंबई-सोलापूर व मुंबई व साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्‍घाटन होणार आहे. आता पुण्याहून मुंबईला तीन तास पाच मिनिटांमध्ये प्रवास करणे शक्य होणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाणसी ते नवी दिल्ली दरम्यान सुरू केली होती. याला ट्रेन१८ असेही म्हणतात. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच आणि वेगवान ट्रेन आहे. त्याचा लूक अगदीच बुलेट ट्रेनसारखा बनवण्यात आला आहे.

Vande Bharat Express
Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार आज हिरवा झेंडा!

या रेल्वेची खासियत, तिचा वेग हा एक वैशिष्ट्यच आहे. एकीकडे ही ट्रेन किती मजबूत आणि उत्तम आहे याबद्दल चर्चा होते. तर दुसरीकडे साध्या जनावरांच्या धडकेत एक्सप्रेसचा सतत आपघात होतो. मागील काही दिवसांचा विचार करता अनेकवेळा वंदे भारत एक्स्प्रेसला अपघाताला सामोरे जावे लागले आहे.  या अपघातात ट्रेनच्या नोझल पॅनलला किरकोळ नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Vande Bharat Express
Vande Bharat Express : ‘वंदे भारत’ अखेर पुण्याच्या ‘ट्रॅक’वर

कधी बैल तर कधी म्हैशींचा कळप धडकल्याने या एक्सप्रेसचे अनेक मोठे अपघात झाले आहेत. मुंबई-अहमदाबाद रूटवर चालणारी वंदे भारत एक्सप्रेस आजपर्यंत पाच वेळ जनावरांना धडकली आहे. आतापर्यंतच्या पाचही अपघातांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसचा पुढचा भाग तुटला आहे. ज्याला इंजिनची टोपी म्हटली जाते ते अनेकवेळा तुटून चक्काचूर झाले आहे. तेही केवळ प्राण्यांमुळे.

Vande Bharat Express
Vande Bharat Express : स्वदेशी वंदे भारत ट्रेनची ही १० वैशिष्ट्ये माहितीयेत?

केवळ वंदे भारतच नाही तर भारतातील सर्व प्रकारच्या ट्रेन जनावरांना धडकतात. यातील काही ट्रेक हे तर जंगलातून वाट काढणारे आहेत. त्यामूळे रोज कुठे ना कुठे एखादा अपघात होतच असतो. केवळ प्राणीच नाही तर अनेकदा नजरचुकीने एखादा माणूस रेल्वेखाली आला अशा घटनाही घडतात.

Vande Bharat Express
Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर वंदे भारतचं तिकीट किती असणार? जाणून घ्या

या वर्षी भारतात एकूण ४,४३३ ट्रेन जनावरांना धडकल्या आहेत. त्यात जानेवारी महिन्यात ३६० घटना घडल्या होत्या तर सप्टेंबर महिन्यात ६३५ घटना घडल्या होत्या.

या अपघातांमुळे जनावरांचा जीव तर जातोच. पण, रेल्वेचे नुकसानही होते. वंदे भारतच्या इंजिनला असलेले टोक सतत तुटते. अपघात झाला की प्राण्यांच्या रक्ताने बरबटलेले रेल्वे इंजिनचे फोटो व्हायरल होतात. तेवढाच त्यावर चर्चा होते आणि सगळे विसरून जातात. पण, यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे.

Vande Bharat Express
Vande Bharat Express : मुख्यमंत्री शिंदेंनी दिली मोदींना अनोखी भेट, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com