बसल्या जागी रनिंग कॉमेंट्री नको; वर्तनावरुन सदस्यांना नायडूंची तंबी

venkaiah naidu
venkaiah naidu

नवी दिल्ली - बसल्या जागी ‘रनिंग कॉमेंट्री'' करू नका, विषय सोडून बोलू नका, जे इथे येऊन बाजू मांडू शकत नाहीत त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करू नका.... एखाद्या शिक्षक- प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना दिलेली ही तंबी नसून लोकशाहीतील सर्वोच्च अशा संसदेत, त्यातही वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून बसणाऱ्या खासदारांना केलेल्या या सूचना आहेत... राज्यसभा अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी आज खासदारांना सभागृहातील वर्तनाबद्दल पुन्हा वरील सूचना जाहीरपणे दिल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपचे भूपेंद्र यादव यांनी शून्य प्रहरात राजस्थान व कॉंग्रेसची सरकारे असलेल्या राज्यांबद्दल आज केलेल्या वक्तव्याने कॉंग्रेस सदस्यांनी गदारोळ केला. राजस्थानात सरकारतर्फे विरोधी पक्षनेत्यांचे दूरध्वनी टॅप होतात अशी तक्रार त्यांनी केली. त्यावर कॉंग्रेस सदस्यांनी तुम्ही पुरावे देऊन सभागृहाच्या पटलावर आपले विधान स्थापित (ऑथेंटिकेट) करा, असे आव्हान दिले. नायडू यांनी यादव यांना कानपिचक्‍या देताच त्यांनी आपले विधान मागे घेतले.

कॉंग्रेसचे कुमार केतकर यांनी, मनसुख हिरानी मृत्यू प्रकरण थेट राममंदिरासाठी दिलेल्या देणग्यांबरोबर जोडल्याने भाजप सदस्यांनी रुद्रावतार धारण केला व पाठोपाठ कर्नाटकचे जी. सी. चंद्रशेखर यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात महाराष्ट्रावर गंभीर आरोप केल्याने मंत्री रामदास आठवले व शिवसेनेचे सदस्य खवळले. हे प्रकार वारंवार घडत असल्याचे लक्षात येताच नायडू यांनी आज पुन्हा खासदारांना त्यांच्या वर्तनाबाबत सूचना केल्या. नायडू म्हणाले, की एखादे सदस्य बोलत असताना अनेक सदस्यांना बसूनच त्यावर प्रतिवाद करण्याची सवय आहे. अशी रनिंग कॉमेंट्री करू नका, शून्य प्रहर हा जनहिताचे मुद्दे मांडण्यासाठी असतो. त्यात वर्तमान ज्वलंत मुद्यांना प्राधान्य द्या. अनेक सदस्य केंद्र व राज्य सरकारांना वादात ओढतात. त्याचा काहीही उपयोग नाही. 

आरोपाऐवजी उदाहरणे द्या
राज्य सरकारे येथे येऊन त्यांची बाजू मांडू शकत नाहीत.तुम्हा आरोप करण्याऐवजी उदाहरणे देऊ शकतात. जोरजोरात बोलले म्हणजे माध्यमे ते ठळकपणे वार्तांकन करतात, असे नाही व येथील कामकाजातूनही तुमची उदाहरणे वगळली जातील. मग उगाच वादग्रस्त बोलून काय फायदा होणार ? याशिवाय शून्य प्रहरातील एखाद्या मुद्यावर संबंधित मंत्र्यांची इच्छा असेल तरच मी त्यांना खुलासा करण्याची परवानगी देऊ शकतो त्यांना सक्ती करू शकत नाही, असेही नायडू यांनी स्पष्ट केले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com