‘वरद’ तटरक्षक दलात दाखल

Varad entered the Coast Guard
Varad entered the Coast Guard

चेन्नई - केंद्रीय जहाजबांधणीमंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत ‘वरद’ ही गस्ती नौका आज भारतीय तटरक्षक दलात दाखल करण्यात आली. किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठीच्या या नौकेची लांबी ९८ मीटर असून, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड या कंपनीने तिची बांधणी केली आहे.

या नौकेमध्ये अत्याधुनिक दिशादर्शन आणि संपर्क यंत्रणा आहे. या प्रकारातील ही पाचवी गस्ती नौका असून, ‘एल अँड टी’ आणखी दोन नौका तयार करणार आहे.

अशी आहे ‘वरद’
लांबी    :    ९८ मीटर
वेग    :    २६ नॉटिकल मैल/तास
पल्ला    :    ५००० नॉटिकल मैल
शस्त्रे    :    ३० मिमी आणि १२.७ मिनीच्या तोफा
वैशिष्ट्ये    :    दोन हलकी हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता, चार अतिवेगवाने             बोटी याशिवाय दिशादर्शनासाठी अत्याधुनिक ब्रिज सिस्टिम, वीज         व्यवस्थापन यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा
उपयोग    :    शोध आणि बचावकार्य, गस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com