'वरदाह' बनले तीव्र चक्रीवादळ

वृत्तसंस्था
शनिवार, 10 डिसेंबर 2016

चक्रीवादळाची तीव्रता वाढण्यासारखे अनुकूल वातावरण बंगालच्या उपसागरात तयार झाले आहे. 11 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत वरदाह सर्वोच्च तीव्रता गाठेल, असे सध्याचे हवामान आहे. त्यानंतर चक्रिवादळ हळू हळू क्षीण होत जाईल, असे दिसते.

चेन्नईः बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले 'वरदाह' आज (शनिवार) तीव्र चक्रीवादळात बदलले आहे. सध्या हे चक्रीवादळ नेल्लोरच्या पूर्वेला 880 किलोमीटरवर आणि मच्छलीपट्टणमपासून 830 किलोमीटरवर आहे. 

'स्कायमेट' या वेबसाईटवरील माहितीनुसार, वरदाह अतिशय संथगतीने प्रवास करत आहे. सध्याची गती ताशी सात किलोमीटर आहे. येत्या चोविस तासात वरदाह अधिक तीव्र स्वरूप धारण करेल, अशी शक्यता आहे. त्यानंतर वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल, असा अंदाज आहे. 

चक्रीवादळाची तीव्रता वाढण्यासारखे अनुकूल वातावरण बंगालच्या उपसागरात तयार झाले आहे. 11 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत वरदाह सर्वोच्च तीव्रता गाठेल, असे सध्याचे हवामान आहे. त्यानंतर चक्रिवादळ हळू हळू क्षीण होत जाईल, असे दिसते. 

आंध्र प्रदेशातील नेल्लोर ते मच्छलीपट्टणम या किनारपट्टीच्या पट्टीच्या प्रदेशात 12 डिसेंबरला संध्याकाळच्या सुमारास वादळ धडकेल, असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: 'Vardah' is converted into Hurricane