Vasundhara Raje : १० खासदार ४० आमदारांसह वसुंधरा राजे मैदानात; भाजपमध्ये अस्वस्था? | vasundhara raje birthday vasundhara raje staked claim for cm face for assembly elections | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasundhara Raje and Amit Shah-Narednra Modi

Vasundhara Raje : १० खासदार ४० आमदारांसह वसुंधरा राजे मैदानात; भाजपमध्ये अस्वस्था?

राजस्थान विधानसभा निवडणूक या वर्षाच्या अखेरीस होईल, असा अंदाज आहे. त्याआधीच राजस्थान भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता, भाजपकडून सातत्याने पक्षात गटबाजी नसल्याचं सांगण्यात येतय. मात्र माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ऐन वाढदिवसाच्या दिवशीच केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया आणि केंद्रीयमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

वसुंधरा राजे यांनी शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्रीपदासाठी आपली दावेदारी सादर केली आहे. दुसरीकडे राजे यांचे पक्षांतर्गत विरोधक सतीश पुनिया आणि शेखावत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा समोर करून आगामी निवडणुकीला सामोरं जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र एकंदरीत घडामोडींमुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद होण्याची शक्यता आहे. मात्र भाजपचे प्रभारी अरुण सिंह यांनी वसुंधरा राजे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून भाजपमधील दोन गटात संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसरीकडे वसुंधरा राजे यांच्या समर्थकांनुसार, सभेसाठी जमलेल्या गर्दीवरून स्पष्ट झालं की, लोक मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजेंनाच पाहात आहेत. ते भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी राजे यांच्याव्यतिरिक्त कोणालाही पाहात नाहीत. शिवाय सभेला १० खासदार आणि ४० आमदारांनी हजेरी लावली. त्यामुळे राजस्थान भाजपमध्ये राजे यांच्या व्यतिरिक्त कोणीही मोठा नेता नाही, असंही राजे समर्थकांचं म्हणणं आहे.

दरम्यान वसुंधरा राजे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमापासून पुनिया आणि शेखावत यांनी अंतर राखलं होतं. त्यामुळे भाजपमध्ये सर्वकाही ठिक नाही हे स्पष्ट झालं आहे.

टॅग्स :BjpRajasthan