Rajasthan Politics : घाबरून खोटं बोलतायत...; CM गेहलोतांच्या 'त्या' दाव्यावर वसुंधरा राजे स्पष्टच बोलल्या | vasundhara raje slam rajasthan cm ashok gehlot | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vasundhara raje slam rajasthan cm ashok gehlot over saving congress government during 2020 revolt

Rajasthan Politics : घाबरून खोटं बोलतायत...; CM गेहलोतांच्या 'त्या' दाव्यावर वसुंधरा राजे स्पष्टच बोलल्या

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी वसुंधरा राजे आणि भाजपच्या दोन आमदारांनी २०२०मध्ये माझे सरकार वाचविले होते, असा खळबळजनक दावा केला. त्यांनी यांनी काँग्रेसचे नेते सचिन पायलट आणि इतर १८ आमदारांनी जुलै २०२०मध्ये त्यांच्याविरुद्ध केलेल्या बंडावर एका जाहीर कार्यक्रमात भाष्य केलं . यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान गेहलोत यांच्या या दाव्यानंतर वसुंधरा राजे यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं झालं काय होतं?

काँग्रेसचे नेते सचिन पायलट आणि इतर १८ आमदारांनी जुलै २०२०मध्ये गेहलोत यांच्याविरुद्ध बंड केले होते. सुमारे महिनाभर चाललेल्या या प्रकरणात शेवटी पायलट यांनी उपमुख्यमंत्रिपदावरून आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर हे बंड शमले होते.

गेहलोत काय म्हणाले?

एका जाहीर कार्यक्रमात बोलताना बंडखोरी केलेल्या आमदारांनाही आशोक गेहलोत यांनी आवाहन केले. ते म्हणाले, "भाजपकडून घेतलेले पैसे परत करून टाका म्हणजे तुम्हाला कोणत्याही दबावाशिवाय तुमचे कर्तव्य पार पाडता येईल. भारतीय जनता पक्षाच्या तीन नेत्यांमुळे माझे सरकार वाचले. त्या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, विधानसभेचे माजी अध्यक्ष कैलास मेघवाल आणि आमदार शोभाराणी कुशवाह यांचा समावेश होता."

"केंद्रीय मंत्री अमित शहा, गजेंद्रसिंह शेखावत आणि धर्मेंद्र प्रधान यांनी माझे सरकार पाडण्याचा कट रचला. त्यांनी पैसे वाटले. आता ते पैसे परत घेत नाहीत. आमदारांकडून ते पैसे का मागत नाहीत, याचे आश्चर्य वाटते", असा दावाही त्यांनी केला.

"तुम्ही जे काही दहा कोटी, वीस कोटी रुपये घेतले असतील व त्यातील जे काही खर्च केले असतील ती रक्कम मी तुम्हाला देतो किंवा ती रक्कम मी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून घेऊन तुम्हाला देतो, ते पैसे त्यांना परत द्या," असे आवाहनही गेहलोत यांनी आमदारांना केले.

"पक्षाने मला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम माझे आहे. जुने सर्व विसरून एकत्र या व विधानसभेच्या पुढील निवडणुकीला सामोरे जाऊ या," असे आवाहनही गेहलोत यांनी केले आहे.

वसुंधरा राजे काय म्हणाल्या?

वसुंधरा राजे यांनी अशोक गेहलोत यांच्यावर पलटवार केला आहे. त्य म्हणाल्या का अशोक गेहलोत हे २०२३ मध्ये झालेल्या परभावाची भीती वाटून खोटं बोलत आहेत. त्या म्हणाल्या की गेहलोत यांनी त्या गृहमंत्री अमित शहायांच्यावर आरोप केले आहेत ज्यांचा प्रामाणिकपणा आणि सत्य निष्ठता सर्वश्रुत आहे.

वसुंधरा राजे म्हणाल्या की, आमदारांच्या खेरदीबद्दल बोलायचे झाल्यास, याचे महारथी तर स्वतः आशोक गेहलोत आहेत. त्यांनी २००८ आणि २०१८ मध्ये अल्पमतात असल्याने हे केलं होतं. तेव्हा भाजप आणि काँग्रेस दोघांना बहुमत मिळालं नव्हतं. मनात आणलं असतं तर आम्ही सरकार स्थापन करु शकत होतो, पण ते भाजपच्या तत्वांमध्ये बसत नाही. मात्र गेहलोत यांनी पैसे वाटून आमदार जमवले आणि सरकार स्थापन केलं.

गेहलोत यांनी माझी स्तुती करणं एक मोठं षडयंत्र आहे. माझ्या जीवनात माझे आपमान गेहलोत यांनी केले आहेत तेवढे कोणी करू शकत नाही. ते २०२३ च्या आगामी निवडणूकीत होणार असलेल्या परभावापासून बचावासाठी ही काल्पनिक गोष्ट रचली आहे. हे दुर्दैवी असून ही डाव यशस्वी होणार नाही.