गुजरातच्या किनाऱ्याला धडकणार 'वायू' चक्रीवादळ; अतिदक्षतेचा इशारा

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जून 2019

गुजरात किनारपट्टीला "वायू' या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला असून, उद्या (ता. 12) हे वादळ किनारी भागामध्ये धडकू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

अहमदाबाद : गुजरात किनारपट्टीला "वायू' या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला असून, उद्या (ता. 12) हे वादळ किनारी भागामध्ये धडकू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, मुख्यमंत्री विजय रूपानी यांनीही किनारी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. सध्या हे वादळ वेरावल किनाऱ्याच्या दक्षिण दिशेला 650 किलोमीटर अंतरावर आहे. पुढील बारा तासांमध्ये या वादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

कच्छ ते दक्षिण गुजरातपर्यंतच्या पूर्ण किनारपट्टीवर हायऍलर्ट जारी करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री रूपानी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vayu Cyclone will Come in coast of Gujarat