अजय देवगणला पितृशोक; विरू देवगण यांचे निधन

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मे 2019

अभिनेता अजय देवगणला पितृशोक झाला असून वीरू देवगण यांचे आज सकाळी (ता.27) निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विरू देवगण यांनी बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

मुंबई: अभिनेता अजय देवगणला पितृशोक झाला असून वीरू देवगण यांचे आज सकाळी (ता.27) निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विरू देवगण यांनी बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. वीरू देवगण यांना हृदयविकाराचा झटका आल्याने सांताक्रूजमधील सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वीरू देवगण गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते. 

विरू देवगण यांच्या पश्चात चार मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी वीरू देवगण आजारी होते. वडिल आजारी असल्यामुळे अजयने दे दे प्यार दे चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी काही मुलाखती रद्द केल्या होत्या.

वीरु देगगण यांनी 80 हून जास्त चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले. वीरू यांनी लाल बादशहा, इश्क, क्रांती, जान, हकीगत यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्ट म्हणून काम केले आहे. वीरु यांनी क्रांती, सौरभ, सिंहासन यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी हिंदुस्थान की कसम या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासोबतच या चित्रपटाची निर्मिती केली होती. तसेच दिल क्या करे या चित्रपटाचे निर्माते देखील तेच होते. 1999 मध्ये विरू देवगण यांनी दिग्दर्शित केलेला ‘हिंदुस्थान की कसम’ हा चित्रपट खूप गाजला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veeru Devgan Father Of Ajay Devgan Dies In Mumbai