स्वातंत्र्यलढ्यातील शूरवीरांच्या कथा मुलांना सांगायला हव्यात - व्यंकय्या नायडू

देशाच्या गौरवशाली इतिहासाने विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर केला पाहिजे.
photo
photoesakal
Summary

देशाच्या गौरवशाली इतिहासाने विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर केला पाहिजे.

देशाची सभ्यता मूल्ये प्रतिबिंबित करणाऱ्या स्वातंत्र्यलढ्यातील सामाजिक एकोप्याच्या कथा शालेय विद्यार्थ्यांना पुन्हा सांगण्याच याव्या. जेणेकरून दुर्लक्षित राष्ट्रीय नायकांच्या जीवनाचे किस्से विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक असल्याने या दोन्हींची अमंलबजावणी तात्काळ व्हावी अशी सचूना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केली आहे. आज एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, भारताच्या भूमीत लढलेल्या आणि जिंकलेल्या शूरवीरांच्या कथा मुलांना सांगितल्या पाहिजेत. देशाच्या गौरवशाली इतिहासाने त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर केला पाहिजे. इतिहास हाच मानवाला शिक्षित, ज्ञानी आणि बंधमुक्त करू शकतो. हे त्यांना पटवून देणे गरजेचे आहे. यासंदर्भात काही त्रुटी असतील तर त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीने दूर केल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

photo
Nitesh Rane Bail: मोठी बातमी! नितेश राणेंना जामीन मंजूर

1860 मध्ये पुण्यात देशातील पहिली खासगी शैक्षणिक संस्था स्थापन झाली होती. ही संस्था क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी अथक प्रयत्नांना तरुणांना वैज्ञानिक शिक्षण देण्यासाठी आणि लोकांमध्ये राष्ट्रीय मूल्ये वाढवण्याच्या उद्देशाने स्थापन केली होती. वासुदेव बळवंत फडके यांचा उल्लेख करून, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे सुरुवातीच्या लढ्यातील क्रांतीकारक म्हणून प्रशंसा केली. स्वराज्याच्या मंत्राचा उपदेश देऊन आणि स्थानिक समुदायांचा पाठिंबा मिळवत ब्रिटिशांविरुद्ध ज्या शौर्याने लढा दिला तो खरोखरच अवर्णनीय असल्याचेही ते म्हणाले आहेत.

अशाच प्रकारे महाराष्ट्राने दिलेल्या योगदानाची महती सांगताना उपराष्ट्रपती म्हणाले, नेते आणि संघटना निर्माण करण्यात आणि स्वातंत्र्यलढ्याचा वैचारिक पाया रचण्यात महाराष्ट्र आघाडीवर होता. दादोबा पांडुरंग, गणेश वासुदेव जोशी, महादेव गोविंद रानडे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारख्या दिग्गजांचे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे. सत्यशोधक समाज यांसारख्या संघटनांनी भारतात अर्थपूर्ण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला. महाराष्ट्रात हा शिक्षणाचा वसा पुढे नेण्यासाठी आता अशीच भावना ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

photo
शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर देणार साक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com