देशभरात रामनवमीला गालबोट! वेणुगोपाल स्वामी मंदिरात रामनवमी उत्सवादरम्यान भीषण आग

Andhra Pradesh Temple Fire
Andhra Pradesh Temple Fireesakal

Andhra Pradesh Temple Fire: रामनवमीच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणांहून अपघातांच्या बातम्या समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार आंध्र प्रदेशात घडला. राज्याच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील तनुकू मंडळाच्या दुवा गावातील वेणुगोपाल स्वामी मंदिरात रामनवमी उत्सवादरम्यान आग लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात रामनवमी उत्सवासाठी लावण्यात आलेल्या पंडालमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे येथे मोठी आग लागली. मात्र, भाविक योग्य वेळी पंडालबाहेर आले, त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही.

अचानक आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मिळालेल्या माहिती नुसार खबरदारी म्हणून मंदिराभोवतीचे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

या अपघाताबाबत, एसपी रवि प्रकाश यांनी सांगितले की, पश्चिम गोदावरीच्या वेणुगोपाल स्वामी मंदिरात सकाळी 11.45 च्या सुमारास आग लागली. पंडालला आग लागल्याचे समजताच लोक तात्काळ मंदिराच्या आवारातून बाहेर गेले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com