शीला दीक्षित यांच्या निधनाने अत्यंत दु:ख : पंतप्रधान

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जुलै 2019

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला शोक.

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरून शोक व्यक्त केला.

यामध्ये ते म्हणाले, शीला दीक्षित यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अत्यंत दु:ख झाले. दिल्लीच्या विकासासाठी त्यांचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या कुटुंबिय आणि त्यांच्या पाठिंबा देणाऱ्यांचे आम्ही सांत्वन करतो. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विटवरून शोक व्यक्त केला. यामध्ये ते म्हणाले, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अत्यंत दु:ख झाले. मी त्यांच्या आप्तेष्ठांचे सांत्त्वन करतो. या दु:खाच्या प्रसंगी देव त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो. त्यांचा आत्म्याला शांती लाभो, हीच प्रार्थना. ॐ शांति शांति शांति...

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या निधनाची वृत्त समजले. त्यामुळे अत्यंत व्यथित झालो. दिल्लीच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. दिल्लीत त्यांनी केलेला विकास कायम लक्षात राहील. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Very Sad to Hear Sheila Dikshit death News says Narendra Modi