esakal | 'बालिका वधू' फेम अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Surekha Sikri

आपल्या हटक्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

'बालिका वधू' फेम अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- आपल्या हटक्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सिक्री गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना 2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावत होती. (Veteran actor Surekha Sikri dies of cardiac arrest at 75)

सुरेखा सिक्री यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, 'तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे आज सकाळी हृदय विकाराचा झटका आल्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांना 2020 मध्ये दुसरा स्ट्रोक आला होता, त्यानंतर निर्माण झालेल्या गुंतागुतीमुळे त्यांचे स्वास्थ ठीक नव्हते. त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांचा परिवार त्यांच्यासोबत होता. ओम साई राम'

हेही वाचा: दीड वर्षानंतर भरल्या शाळा, विद्यार्थ्यांचे ऑफलाईन वर्ग सुरु

सुरेखा सिक्री यांनी 1978 मध्ये सिनेसृष्टीत 'किस्सा कुर्सी का' मधून पदार्पन केले होते. त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तमस (1988), मम्मो (1995) आणि बधाई हो (2018) या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय. बालिका वधू मालिकेतील त्यांच्या कामाचे कौतुक झाले होते. शिवाय आयुष्यमान खुराना याच्या बधाई हो मध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात पसंद करण्यात आलं. नेटफ्लिक्सवरील Ghost Stories मध्ये त्यांना पडद्यावर शेवटचं पाहण्यात आलं होतं.

loading image