"व्हायब्रंट गुजरात' अडचणीत

मंगळवार, 3 जानेवारी 2017

पाटीदार अनामत आंदोलन समितीचे (पास) संयोजक, मागासवर्गीय नेते अल्पेश ठाकोर आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी या मुद्यांवर योग्य ते निर्णय न झाल्यास आम्ही परिषदेस व्यत्यय आणू, असा इशारा दिला आहे.

 

अहमदाबाद - गांधीनगर येथे होणारी व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार परिषद अडचणीत आली आहे. येत्या 10 जानेवारील या परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे; परंतु त्याआधीच निश्‍चित वेतन आणि कंत्राटी कामगारांना कायम करण्याबाबतच्या मुद्यांमुळे ही परिषद होणार की नाही, याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पाटीदार अनामत आंदोलन समितीचे (पास) संयोजक, मागासवर्गीय नेते अल्पेश ठाकोर आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी या मुद्यांवर योग्य ते निर्णय न झाल्यास आम्ही परिषदेस व्यत्यय आणू, असा इशारा दिला आहे. यासाठी सात जानेवारीची मुदत देण्यात आली असून, तोपर्यंत राज्य सरकारने सर्व कंत्राटी कामगारांना कायम करावे, असे सांगण्यात आले आहे. सद्यःस्थितीला गुजरातमध्ये सुमारे पाच लाख निश्‍चित वेतन असलेले कामगार आहेत. "आशा'अंतर्गत काम करणाऱ्या महिला आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देणे कायद्यानुसार आवश्‍यक असून, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देणे हीदेखील सरकारची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.

Web Title: vibrant Gujarat to face problem?