उपराष्ट्रपतींचा सिक्कीम दौरा खराब हवामानामुळे रद्द

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

खराब हवामानामुळे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा दोन दिवसांचा सिक्कीमचा दौरा रद्द करण्यात आला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात आयसीएफएआय विद्यापीठाच्या प्रवक्‍त्याने पदवीप्रदान कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांना सांगितले, की खराब हवामानामुळे उपराष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरला गंगटोकला उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.
 

गंगटोक : खराब हवामानामुळे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा दोन दिवसांचा सिक्कीमचा दौरा रद्द करण्यात आला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात आयसीएफएआय विद्यापीठाच्या प्रवक्‍त्याने पदवीप्रदान कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांना सांगितले, की खराब हवामानामुळे उपराष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरला गंगटोकला उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.

उपराष्ट्रपतींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की गंगटोक, सिक्कीम येथे जाण्यासाठी बगडोरा येथे पोचलो. मात्र खराब हवामानामुळे आम्ही येथे उतरु शकत नाही. त्यामुळे अरुणाचल प्रदेशाला जाण्याचे मी नियोजन करीत आहे. 
 

Web Title: Vice President Sikkim tour canceled due to bad weather