कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त 7 लाखांची पार्टी, तीन जणांना अटक | Video Viral of pet animal birthday Celebration | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral of pet animal birthday Celebration
कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त 7 लाखांची पार्टी, तीन जणांना अटक

कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त 7 लाखांची पार्टी, तीन जणांना अटक

हौसेला मौल नाही असं म्हटलं जातं. त्या हौसेसाठी माणूस काही वेगळं कराय़ला तयार होतो. सध्याच्या सोशल मीडियाच्या (Social Media) काळात तर अनेकजण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वेगवेगळ्या आयडिया शेयर करत असतात. एकानं तर त्याच्या पाळीव कुत्र्याच्या बर्थ डे (Dog Birthday Celebration) निमित्तानं जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. ते त्याला महागात पडलं आहे. त्यानं त्या पार्टीमध्ये सात लाख रुपयांचा खर्च केला. त्या पार्टीमुळे तो चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. सगळीकडे त्याची चर्चा आहे. (Video Viral of pet animal birthday Celebration)

मालकानं आयोजित केलेल्या त्या पार्टीमध्ये कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. कुत्र्याचा जन्मदिन मालकासाठी चांगलाच महागात पडला आहे. गुजरातमधील या घटनेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या पार्टीमध्ये झालेल्या गर्दीनं कोरोनाचा प्रसार होण्याची भीती होती. असा आरोप त्या मालकावर ठेवण्यात आला. त्यामुळे त्याच्या दोन भावासहित आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, चिराग पटेल, त्याचा भाऊ उर्विश पटेल हे दोघेही अहमदाबाद येथे राहणारे आहेत. त्यांनी आपला मित्र दिव्येश महारियासोबत आपल्या पाळीव कुत्र्याच्या जन्मदिनानिमित्त मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते.

हेही वाचा: Social Media Day : तुम्ही सोशल मीडियाचा की सोशल मीडिया तुमचा वापर करून घेतंय?

पोलिसांनी सांगितलं की, त्या पार्टीमध्ये उपस्थितांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. लोकांनी सोशल डिस्टन्स आणि कोविडच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध गायकानं देखील हजेरी लावली होती. मात्र त्याचे नाव पोलिसांनी जाहीर केलेलं नाही. त्याच्या हस्ते केक कापण्यात आला होता. सध्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याची चर्चाही आहे.

हेही वाचा: 'कही ये वो तो नही' प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचा Video Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top