Vidhan Sabha 2019 : तरुण जास्तीत जास्त मतदान करतील; पंतप्रधानांना आशा

Vidhan Sabha 2019 pm Narendra Modi twitter post Maharashtra elections
Vidhan Sabha 2019 pm Narendra Modi twitter post Maharashtra elections

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभांच्या निवडणुकांच्या निमित्ताने ट्विटरवरून मतदानासाठी आवाहन केले. आज, हरयाना आणि महाराष्ट्रातील विधानसभेसाठी तर काही ठिकाणी लोकसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. 

पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशात हरयाना आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहे. काही ठिकाणी पोटनिवडणुकाही होत आहेत. 
मी मतदारांना आवाहन करतो की त्यांनी उच्चांकी, विक्रमी मतदान करावे. मला आशा आहे तरुण मोठ्या संख्येने मतदान करतील.

महाष्ट्रातील निवडणुकांचा उल्लेख करताना, मोदी यांनी म्हटले आहे की, आज महाराष्ट्राची जनता पुढील पाच वर्षे कोणाला सरकार चालविण्याची संधी द्यायची हे ठरविणार आहेत. तेव्हा महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू-भगिनी विशेषत: माझ्या तरुण मित्रांना माझे आवाहन आहे की, आज विक्रमी संख्येने मतदान करून लोकशाहीचा हा उत्सव समृद्ध करावा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com