विजय मल्ल्या तिसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात ?

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

पिंकी ललवाणी ही माजी हवाईसुंदरी आहे. ती 62 वर्षीय विजय मल्ल्यासोबत राहत असून, त्यांनी आता विवाह करण्याचे ठरवले आहे. विजय मल्ल्याने पिंकी ललवाणी या महिलेला किंगफिशर एअरलाइन्समध्ये नोकरीची संधी दिली होती.

नवी दिल्ली : देशातील विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटींचे कर्जे बुडवून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे. विजय मल्ल्या हा तीन वर्षांपासून त्याची व्यावसायिक भागीदार असलेल्या पिंकी ललवाणी यांच्याशी विवाह करणार आहे.

पिंकी ललवाणी ही माजी हवाईसुंदरी आहे. ती 62 वर्षीय विजय मल्ल्यासोबत राहत असून, त्यांनी आता विवाह करण्याचे ठरवले आहे. विजय मल्ल्याने पिंकी ललवाणी या महिलेला किंगफिशर एअरलाइन्समध्ये नोकरीची संधी दिली होती. त्यानुसार ती किंगफिशर एअरलाइन्समध्ये हवाईसुंदरी म्हणून काम करत होती. त्यानंतर विजय मल्ल्या आणि पिंकी ललवाणी हे दोघेही कामानिमित्त जवळ आले होते. आता या दोघांनी विवाह करण्याचे ठरवले आहे. मात्र, विवाहाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 

vijay mallya and  Pinky Lalwani

भारतीय स्टेट बँकेचे तब्बल 9000 कोटी रूपयांचे कर्जे थकित ठेऊन विजय मल्ल्याने मार्च 2016 रोजी भारतातून परदेशात पलायन केले होते. त्याला पुन्हा मायदेशी आणण्यासाठी सक्तवसुली संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, अद्यापही त्याला भारतात आणण्यास यश आलेले नाही.

दरम्यान, विजय मल्लाने हवाईसुंदरी असलेल्या समीरा त्याब्जी यांच्याशी 1986-87 मध्ये विवाह केला होता. त्यानंतर त्याने रेखा मल्ल्या यांच्याशी 1993 मध्ये विवाह केला होता. विजय मल्ल्याला या दोघींपासून तीन अपत्ये असून, त्यांची नावे सिद्धार्थ, लिअन्ना आणि तान्या आहे. 

Web Title: vijay mallya and Pinky Lalwani will marriage vijay mallya marriage in third time