पंतप्रधानांच्या वक्‍तव्यावर मल्ल्याचा सवाल 

mallya
mallya

नवी दिल्ली : लोकसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला उल्लेख फरार उद्योगपती विजय मल्ल्या याच्या जिव्हारी लागला असून, त्याने याला आज ट्‌विटरद्वारे उत्तर दिले. कर्जफेडीबाबत मी दिलेली ऑफर स्वीकारावी, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी बॅंकांना का देत नाहीत, असा सवाल मल्ल्याने केला आहे. 

बॅंकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवून जे देश सोडून पळाले आहेत. ते आज ट्‌विटरवर रडत आहेत, असा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी मल्ल्याचे नाव न घेता केला होता. त्यावर व्यक्त होत मल्ल्याने आज अनेक ट्‌विट केले. ""पंतप्रधानांच्या त्या वक्तव्याचा रोख माझ्याकडेच होता. मी आदरपूर्वक विचारतो, की मी दिलेली ऑफर बॅंकांनी स्वीकरावी, असे निर्देश पंतप्रधान का देत नाहीत, असे झाल्यास माझ्याकडील पूर्ण कर्ज वसूल केल्याचे श्रेय तरी त्यांना घेता येईल,'' असे मल्ल्याने ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयात मी कर्ज भरण्याची तयारी दर्शविली होती. याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे सांगत, माहिती नाही; पण बॅंका किंगफिशर एअरलाइन्सचे कर्ज भरून घेत नाहीत, असा प्रश्नही त्याने या वेळी उपस्थित केला. 

"ईडी'च्या दाव्यामुळे वेदना 
मी मालमत्ता लपविल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने केला होता, त्यामुळे मला खूप वेदना झाल्या. न्यायालयाला मी 14 हजार कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती दिली. मग मी मालमत्ता लपविली असे कसे म्हणता येईल, असा प्रश्न मल्ल्याने उपस्थित करत लोकांची चुकीच्या पद्धतीने दिशाभूल केली जात असल्याचे नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com