मल्ल्यांची सतराशे कोटींची मालमत्ता जप्त होणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

मुंबई- उद्योगपती विजय मल्ल्या यांची मालमत्ता जप्त करण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिल्याने सक्त वसुली संचालनालय आणखी सतराशे कोटी रुपयांची मालमत्ता लवकरच जप्त करणार आहे.

मुंबई- उद्योगपती विजय मल्ल्या यांची मालमत्ता जप्त करण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिल्याने सक्त वसुली संचालनालय आणखी सतराशे कोटी रुपयांची मालमत्ता लवकरच जप्त करणार आहे.

विजय मल्ल्यांसह आणखी काही जणांवर करचुकवेगिरीप्रकरणी दाखल खटल्यात न्यायालयाने मल्ल्या यांना गुरुवारी (ता. 10) फरारी घोषित केले आहे. तसेच, त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्याची परवानगीही "ईडी'ला दिली. मल्ल्या यांचे विविध कंपन्यांतील समभाग "ईडी' जप्त करणार आहे. ही मालमत्ता एकूण सतराशे कोटी रुपयांची आहे. गुन्हे प्रक्रिया संहितेच्या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. कर चुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत मल्ल्या यांची 8 हजार 41 कोटी रुपयांची मालमत्ता याआधी जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, मल्ल्या यांची विदेशातील मालमत्ता जप्त करण्याची ईडीची मागणी न्यायालयाने काल फेटाळून लावली होती. मल्ल्या यांच्यावर करचुकवेगिरी, धनादेश न वटल्याप्रकरणी तसेच, आयडीबीआय बॅंकेच्या नऊशे कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी खटले दाखल आहेत. मल्ल्या हे सध्या लंडनमध्ये असून, खटल्यांच्या सुनावणीला ते न्यायालयात अद्याप उपस्थित राहिलेले नाहीत.

Web Title: Vijay Mallya assets: ED makes Rs 1700-crore fresh seizures