विजय मल्ल्या म्हणतात - हेचि फळ काय मम तपाला!

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

मला लक्ष्य करण्यात येणाऱ्या व कोणताही कायदेशीर पुरावा नसलेल्या अशा मोहिमांची आता मला सवय झाली आहे. यामधून सरकारी यंत्रणा काय करु शकते तेच दिसून येते

नवी दिल्ली - आर्थिक गैरव्यवहारामधील आरोपी असलेल्या विजय मल्ल्या यांनी आज (गुरुवार) सेबीवर जोरदार टीका करत त्यांच्याविरोधातील आरोप हे तथ्यहीन असल्याचा दावा केला. सेबीने मल्ल्या यांच्यावर भांडवली बाजारामध्ये कोणताही व्यवहार करण्यासंदर्भात बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर संतप्त मल्ल्यांकडून सेबीला ट्विटच्या माध्याममधून लक्ष्य करण्यात आले आहे.

"गेल्या 30 वर्षांत मी जगातील सर्वांत मोठी स्पिरिट कंपनी निर्माण केली. याचबरोबर मी एक यशस्वी विमान वाहतूक कंपनी सुरु केली. आणि त्याचे फळ मला अशा प्रकारे मिळत आहे,' अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे!

"युनायटेड स्पिरिट्‌सकडून किंगफिशर एअर कंपनीकडे बेकायदेशीररित्या निधी वळविण्यात आल्याचा आरोप सेबीकडून करण्यात आला आहे. हा आरोप म्हणजे विनोद म्हणावा लागेल. सेबीचा हा आरोप तथ्यहीन आहे. युएसएलच्या आर्थिक व्यवहारांस उच्चस्तरीय लेखापरीक्षक (ऑडिटर्स), संचालक मंडळ व भागधारकांकडून मान्यता मिळाली होती. मला लक्ष्य करण्यात येणाऱ्या व कोणताही कायदेशीर पुरावा नसलेल्या अशा मोहिमांची आता मला सवय झाली आहे. यामधून सरकारी यंत्रणा काय करु शकते तेच दिसून येते,'' असे मल्ल्या यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Vijay Mallya breathes fire against SEBI ban order